लोहा| हिंदी भाषा देशभरातील लोकांना एकमेकांशी जाेडणारी एक महत्त्वपूर्ण संपर्क भाषा आहे. ही भाषा साहित्यिक दृष्टीने तर अत्यंत प्रगल्भ तर आहेच शिवाय ही भाषा रोजगाराच्या दृष्टीने देखील महत्त्वाची आहे टंकलेखन, अनुवाद, गीतलेखन यांसारख्या क्षेत्रात हिंदी भाषेतूनअनेक रोजगार मिळतो आहे. असे प्रतिपादन प्रा.डाॅ.मनोहर भंडारे यांनी केले.
लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालया च्या हिंदी विभागाच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक ‘मुंशी प्रेमचंद स्मृतिदिनानिमित्त’ ‘पुरस्कार वितरण व व्याख्यान कार्यक्रमाचे’ आयोजन महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ अशोकराव गवते याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला व्ही जी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख व्याख्याते म्हणून उदगीर येथील हावगी स्वामी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ.मनोहर भंडारे होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, हिंदी ही एक अत्यंत दर्जेदार भाषा आहे. या भाषेच्या साहित्यातून मानवी जीवनाचे सांगोपांग वर्णन केले गेले आहे. मुंशी प्रेमचंद यांनी आपल्या अनेक कथा कादंबऱ्यांमधून तत्कालीन मानव जीवनाचे सर्वांगीण चित्र रेखाटले आहे. विद्यार्थ्यांनी अशा साहित्याचा आस्वाद घ्यावा.ही भाषा रोजगार निर्मिती करून देणारी भाषा आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागाध्यक्ष प्रा.डाॅ.नानासाहेब गायकवाड यांनी केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये लेखन, भाषण तसेच वाचन कौशल्य विकसित व्हावे म्हणून विभागाच्या वतीने अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते असे यांनी नमूद केले. हिंदी सप्ताह निमित्त घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डाॅ.जयराम सूर्यवंशी यांनी केले.