Prof. Dr. Manohar Bhandare : हिंदी भाषेच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी – प्रा.डाॅ.मनोहर भंडारे -NNL
लोहा| हिंदी भाषा देशभरातील लोकांना एकमेकांशी जाेडणारी एक महत्त्वपूर्ण संपर्क भाषा आहे. ही भाषा साहित्यिक दृष्टीने तर अत्यंत प्रगल्भ तर आहेच शिवाय ही भाषा रोजगाराच्या दृष्टीने देखील महत्त्वाची आहे टंकलेखन, अनुवाद, गीतलेखन यांसारख्या क्षेत्रात हिंदी भाषेतूनअनेक रोजगार मिळतो आहे. असे प्रतिपादन प्रा.डाॅ.मनोहर भंडारे यांनी केले.
लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज महाविद्यालया च्या हिंदी विभागाच्या वतीने ८ ऑक्टोबर रोजी हिंदीचे प्रसिद्ध साहित्यिक ‘मुंशी प्रेमचंद स्मृतिदिनानिमित्त’ ‘पुरस्कार वितरण व व्याख्यान कार्यक्रमाचे’ आयोजन महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ अशोकराव गवते याच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला व्ही जी चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रमुख व्याख्याते म्हणून उदगीर येथील हावगी स्वामी महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डाॅ.मनोहर भंडारे होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त...
