नांदेडसोशल वर्क

Gift of copy of Constitution of India to newspaper office ; वृत्तपत्र कार्यालयास भारतीय संविधानाची प्रत भेट – NNL

नांदेड | भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या औचित्याने येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील सकाळ विभागीय कार्यालयास भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली. यावेळी सकाळ समुहाचे उपसंपादक व बातमीदार गौरव वाळिंबे, वरिष्ठ बातमीदार शरद काटकर, बातमीदार शाम जाधव, जाहिरात प्रतिनिधी गजानन बिज्जेवार, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्य कार्याध्यक्ष साहित्यिक समीक्षक प्रज्ञाधर ढवळे, कवी थोरात बंधू, शाहीर आ. ग. ढवळे, सामाजिक कार्यकर्त्या माया थोरात, एकनाथ कल्याणकर, सटवाजी माचनवार, संजय पाटील, सूनील दवणे यांची उपस्थिती होती.

येथील सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने लोकशाहीचा चौथा स्तंभ शहरातील दैनिक वृत्तपत्र कार्यालयास एक भारतीय संविधानाची प्रत भेट देण्याचा निर्णय मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. भारतीय संविधान स्वतः प्रत अर्पण होण्याच्या घटनेला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने शहरातील सकाळ विभागीय कार्यालयास भारतीय संविधानाची प्रत भेट देण्यात आली. ही प्रत शरद काटकर यांनी स्विकारली. यावेळी थोरात बंधू यांची सुकन्या सामाजिक कार्यकर्त्या माया थोरात यांना सकाळ कार्यालयाकडून वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यात आल्या.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button