हदगाव, शेख चांदपाशा| शासनाच्या विविध योजना द्वरे हदगाव शहरात व तालुक्यात बहुतांशी सुरु असलेल्या कामाची माहीती देणारे फलक लावणे अवश्यक आहे. पण कञांटदारांने फलक लावले नसल्याने या कामात ‘कुछ तो गडबड है ‘चे स्पष्ट संकेत दिसुन येत आहे.
शहरातील व तालुक्यातील बहुतांशी रोडचा सुमार दर्जा पाहील्यावर दिसुन येत जर या बाबतीत विशेष पथक नेमल्यास फार मोठा घोळ उघडकीस येण्याची शकयता आहे. हदगाव शहरात तालुक्यात कोट्यावधी रुपायाचे रोडचे कामे सुरु आहेत. यामुळे शहरातील नागरीक व गावातील ग्रामस्थ संभ्रमात असून, करोडी रुपयाच्या कामाची माहीती नागरिकांनाच नाही अशी परिस्थिती आहे. शासनाद्वरे विविध आमदार खासदार अन्य लोकप्रतिनिधी निधी आणलेला आहे अस सागतात. या बाबतीत माहीती विचारणा केली असता काही कंञाटदार अन्य राजकीय लोकप्रतिनीधीचे लाडके असल्याने संबंधित विभाग प्रशासनाचे अधिकारी पण गुपचूपपणे रोडच्या कामाचा दर्जा न पहाता त्याची बीले सहज पास होत आहेत.
कारण हे नामधारी शासकीय कंञाटदार जरी आसला तरी कामा करणारे लोकप्रतिनिधीच्या जवळचे खास तर आहेच. इतकेच नव्हे तर मंञालय वरिष्ठ अधिका-यापासुन ते जिल्हास्तारवरच्या वरिष्ठ आधिका-या पर्यत त्या “खास ” च्या ओळखी असल्याने तालुका पातळीवरचे अधिकारी त्यांना दबकुनच राहत असल्याने कंञाटदाराच्या नावावर कुणी तरी व्यक्ती गुत्तेदारी करत असल्याने कामाचा दर्जा सुमार आहे.
या बाबतीत नागरिक व ग्रामस्थ कामाच्या बाबतीत अनभिज्ञ असुन, या बाबतीत संबंधित विभाग स्पष्टपणे सागतात. ते काम आमच्या विभागा मार्फत नाही अस सागुन मोकळे होतात. विशेष कामाच्या माहीती फलकावर कामाच्या मंजुरीची तारीख मुख्यकामातील घटक योजनेसाठी एकाग्र निधी कञांटदाराचे नाव व संबंधित अधिका-याच नाव व मोबाईल क्रमांक कामाची मुदत यासह कामाचा तपशिल दिला जातो. माञ असे फलक माञ सुरु असलेल्या कामावर दिसुन येत नाही हे आवर्जून उल्लेख करावा लागेल.
न.पा.प्रशासन व सां.विभाग एकमेकावर जबाबदारी
हदगाव शहरातही रोड बहुतांशी प्रभागात जिथे आवश्यकता नाही तिथे आपल्या सोयीनूसार कञाटदारानी राजकीय नेत्यांना हताशी धरुन कामे आणलेली आहे. थातुर मातुर कोणतेही नियोजन न करता सिमेंट रोडची कामे करण्याचा सपाटा लावला आहे. या बाबतीत न.पा. प्रशासनाच्या संबंधित विभागाच्या माहीती नूसार शहरातील बहुसंख्य कामे सा.बा विभागाद्वरे करण्यात येत असल्याच त्यानी सागितल. जेव्हा हदगाव शहरातील उपविभागीय सा.बा. विभागाशी संपर्क साधला असता नेहमी कार्यालयातुन साहेब दौ-यावर असल्याचे सागण्यात आले.