नवीन नांदेड l या चिमण्यांनो परत फिरा रे …! या चित्रपट गिता प्रमाणे हडको येथील इंदिरा गांधी हायस्कुलच्या १९९१ सालच्या दहावी वर्गातील विद्यार्थांचा स्नेह मेळावा दि २९ सप्टेबर रोजी संपन्न झाला, यावेळी बालमित्र तबल तेहतिस वर्षांना एकत्र आले होते ,यातील सर्वच विद्यार्थांनी पन्नाशीचा टप्पा गाठत असल्याने त्यांच्यातील लहाणपणीचा उत्साह पुन्हा पहावयास मिळाला. यास्नेह मेळाव्यामुळे पुन्हा तेवढया जोमाने मैत्रीची गाठ जोडल्या गेल्याची प्रतिक्रीया अनेकांनी दिल्या! तर शालेय जिवनाच्या आठवणीला उज्जाळा मिळाला .
शारदा भवन सोसायटीच्या हडको येथील इंदिरा गांधी हायस्कुलच्या १९९१ सालच्या दहावी इयत्ताच्या सर्वच तुकड्याचा स्नेह मेळावा दि २९ रोजी हाँटेल आकृती येथे आयोजित करण्यात आला होता ,या मेळाव्यात दहावीच्या सर्वच तुकडीतील विद्यार्थांना आमंत्रीत करण्यात आले होते . यात १४१ विद्यार्थांनी सहभाग घेतला होता मुंबई ,पुणे ,नाशिक खडकपुर, संभाजीनगर यासह विविध राज्यातील विस्तापित झालेल्या विद्यार्थांनी हजेरी लावली होती, सर्व प्रथम विद्यार्थांनी शाळेला भेट दिली, राष्ट्रगीत घेवुन आपल्या वर्गात प्रवेश केला. त्यानंतर १९९१च्या आठवणीना उज्जाळा दिला. नंतर हाँटेल आकृती कौठा नांदेड येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती लावली. त्यानंतर शिकवलेल्या ३५ शिक्षकांचा सत्कार केला.
यात जि. एल.सुर्यवंशी,देविचरण राठोड ,ललिता शिंदे यांनी मनोगत व्यक्त करुन विद्यार्थांना पुढील आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या,तब्बल तेहतिस वर्षांनी एकत्र आल्यामुळे प्रत्येकांनी आपला परिचय करुन देत आपण कोणत्या तुकडीत होतो. आपण सध्या कुठे वास्तव्यास आहोत,सध्याचा व्यवसाय काय आहे ,याची माहिती दिली,त्यानंतर सर्व मिञ मैञीनी एकञ स्नेह भोजनाचा आनंद घेत शाळेय जिवनातील खेळ , खोड्या , केलेल्या गंमती जमंती अनेक आठवणीला उजाळा देत अनेकांनी बालवयातील आठवणी सांगत मज्जा केली ,तर अनेकांनी बालवयातील मित्रांची यापुढे एकमेकाच्या सुख-दुखात सहभागी रहाण्याचे वचन दिले .
दुपारच्या सत्रात शालेय जीवनातील संगित खुर्ची ,संगित मैफील यात सहभाग घेत गोपाळ वावडे ,उज्वला गजभारे ,कृष्णा किंगरे यांच्यासह अनेकांनी गिताचे बहारदार सादरीकरण केले,तर चित्ताबंर कामठेवाड यांनी संगित खुर्चीचे प्रोत्साहनपर पारितोषीक दिले. त्यानंतर दिवंगत शिक्षक- शिक्षीका,मित्र – मैत्रीनीना श्रध्दाजंली अर्पण केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण देशमुख यांनी तर सुत्रसंचलन प्रकाश जाधव ,प्रज्ञा तबांखे यांनी केले तर आभार संतोष मोरे यांनी मानले . हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयप्रकाश वाघमारे ,अभय जोशी , सुजाता जोंधळे, मनीषा राजे, दिनेश पोतदार ,प्रल्हाद चमकुरे ,सुनीता गंजेवार ,रामदास पेद्देवाड यांनी प्रयत्न केले .