HomeकरियरStudents should pay attention to how : अभ्यासाला केंद्रबिंदू मानत उच्च पदवी...

Students should pay attention to how : अभ्यासाला केंद्रबिंदू मानत उच्च पदवी कशी मिळवता येईल याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे – महाविरचंद श्रीश्रीमाळ -NNL

हिमायतनगर| विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन अभ्यासाला केंद्रबिंदू मानत उच्च पदवी कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजचे आहे. असे प्रतिपादन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केलं.

IMG 20240927 WA0013 Students should pay attention to how : अभ्यासाला केंद्रबिंदू मानत उच्च पदवी कशी मिळवता येईल याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे - महाविरचंद श्रीश्रीमाळ -NNL

ते हिमायतनगर येथील भूमिपुत्र तथा सध्या अलिबाग येथे राहणारे डॉ. प्रशांत कुमार जन्नावार यांची कन्या हृतिका प्रशांत जन्नावार हिस LLM मध्ये सुवर्ण पदक प्राप्त झाले. नुकतेच पुणे येथे महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते सुवर्ण पदक देऊन नुकताच सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर दिनांक २६ रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट व आर्य वैश्य समाजच्या वतीने आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्याच्या मंचावरून बोलत होते. यावेळी मंचावर सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री परमेश्वर मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेवानिवृत्त मुख्यध्यापक एन.के. अक्कलवाड सर, आर्य वैश्य समाजाचे श्याम मारुडवार आदींसह अनेकांची उपस्थिती होती.

IMG 20240927 WA0013 Students should pay attention to how : अभ्यासाला केंद्रबिंदू मानत उच्च पदवी कशी मिळवता येईल याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे - महाविरचंद श्रीश्रीमाळ -NNL

यावेळी पुढे बोलताना श्रीश्रीमाळ म्हणाले कि, जिद्द, चिकाटी आणि कठीण परिश्रमाने हृतिका प्रशांत जन्नावार हिने LLM परीक्षेत यश मिळविले. राष्ट्रपतींच्या हस्ते गोल्ड मेडल देऊन सन्मान झाला हि बाब हिमायतनगर वासियांसाठी भूषणावह आहे. यापुढे हृतिकाने मिळविलेल्या पदवीचा मान राखत आपण जिथे जन्मलो, जी आपली मायभूमी आहे. तिच्याशी कृतज्ञ होण्यासाठी आपल्या भागातील गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यावर भर द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी गजानन तुप्तेवार, राजू बंडेवार, सुधीर उत्तरवार, श्याम रायेवार, प्रमोद तुप्तेवार, रवींद्र दमकोंडवार, अमोल पेन्शनवार, पंकज बंडेवार, राजू तुप्तेवार, भावेश पिंचा, अमोल रायेवार, संगणवार काका, कांचन बंडेवार, अशोक अनगुलवार, संजय माने, आदींसह आर्य वैश्य समाजाच्या महिला पुरुष बांधवानी हृतिकच्या सत्कार सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments