Students should pay attention to how : अभ्यासाला केंद्रबिंदू मानत उच्च पदवी कशी मिळवता येईल याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे – महाविरचंद श्रीश्रीमाळ -NNL
हिमायतनगर| विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन अभ्यासाला केंद्रबिंदू मानत उच्च पदवी कशी मिळवता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजचे आहे. असे प्रतिपादन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महाविरचंद श्रीश्रीमाळ यांनी केलं.
ते हिमायतनगर येथील भूमिपुत्र तथा सध्या अलिबाग येथे राहणारे डॉ. प्रशांत कुमार जन्नावार यांची कन्या हृतिका प्रशांत जन्नावार हिस LLM मध्ये सुवर्ण पदक प्राप्त झाले. नुकतेच पुणे येथे महामहीम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचे हस्ते सुवर्ण पदक देऊन नुकताच सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर दिनांक २६ रोजी हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्ट व आर्य वैश्य समाजच्या वतीने आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्याच्या मंचावरून बोलत होते. यावेळी मंचावर सत्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी श्री परमेश्वर मंदिर संस्थानचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेवानिवृत्त मुख्यध्यापक...
