नांदेडधार्मिक

Power supply interrupted during Ain Ganeshetsav Gaurai Puja : ऐन गणेशेत्सव गौराई पूजनवेळी वीजपुरवठा खंडित; महावितरण विभागाचा भोंगळ कारभारावर जनता नाराज -NNL

हिमायतनगर| शहर व परिसरात महावितरण विभागाचा भोंगळ कारभार ऐन सणासुदीच्या काळात समोर येऊ लागला आहे. सण उत्सवाच्या काळातही विजेचा लपंडाव सुरू असल्याने गणेश भक्तांसह माता गौरीच्या उत्सवात अडथळे निर्माण झाल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर पुढील दिवसात हा प्रकार थांबला नाहीतर संतप्त गणेशभक्त महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत.

गेल्या तीन दिवसापासून हिमायतनगर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात ऐन मुख्य आरती पूजेच्या वेळेला वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे गणेश भक्त व गौरीपूजनाच्या तयारीत असलेल्या महिला वर्गातून महावितरण विभागाच्या नाकर्तेपणा बाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या ०७ तारखेला गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. उत्सवाच्या काळात सकाळी आणि सायंकाळी रात्रीला आठ ते १० च्या दरम्यान गणरायाची भाविक भक्ताकडून आरती, महापूजा आणी विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे.

459344234 512095201564157 3415404249195399543 n Power supply interrupted during Ain Ganeshetsav Gaurai Puja : ऐन गणेशेत्सव गौराई पूजनवेळी वीजपुरवठा खंडित; महावितरण विभागाचा भोंगळ कारभारावर जनता नाराज -NNL

उत्सवाचा आनंदाच्या पर्वाला सुरु होण्याच्या वेळेला वीजपुरवठा खंडित होऊ लागली आहे.गेल्या दोन दिवसापासून तर तासंतास वीजपुरवठा खंडित राहिल्याने गणेशभक्तांच्या आनंदावर विरझन पडलं आहे. त्यातच माता गौराईचे आगमन झालेले असताना देखील महावितरण विभागाकडून वीज पुरवठा खंडित करून उत्सवामध्ये विरझन टाकले जात असल्याचा प्रत्यय येऊ लागला आहे. हिमायतनगर येथील पोलीस ठाण्याच्या वतीने गणेशोत्सवाच्या संदर्भात तहसीलदार पल्लवी टेमकर, पोलीस अधिकारी अमोल भगत यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीच्या बैठकीच्या वेळी महावितरणचे अधिकाऱ्यांना गणेशोत्सव आणि गौरी उत्सवाच्या काळात सुरळीत वीज पुरवठा व्हावा अशा सूचना करण्यात आल्या होत्या.

459474868 512093528230991 7548654682379355267 n Power supply interrupted during Ain Ganeshetsav Gaurai Puja : ऐन गणेशेत्सव गौराई पूजनवेळी वीजपुरवठा खंडित; महावितरण विभागाचा भोंगळ कारभारावर जनता नाराज -NNL

त्यानंतर देखील उत्सवाची रेलचेल रंगात आली असताना रात्रीच्या वेळेला वीजपुरवठा खंडित होत असल्याने महापूजा आरतीच्या कार्यक्रमात व्यत्यय निर्माण होऊ लागला आहे. गणेशोत्सव आणखी चार दिवस बाकी आहेत, आगामी पुढील दिवसात तरी वीज पुरवठा खंडित करून गणेशभक्तांची नाराजी महावितरण कंपनीने ओढवून घेऊ नये अशी मागणी केली जात आहे. अन्यथा महावितरणच्या कारभाराच्या विरोधात संतप्त गणेश भक्त महावितरण कार्यालयावर हल्लाबोल करण्याच्या तयारीत आहेत. मग होणाऱ्या परिणामाची जबाबदारी महावितरण विभागाची राहील असेही काही गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविले आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!