हिमायतनगर। हिमायतनगर शहरातील वार्ड क्रमांक एक मध्ये येणाऱ्या बजरंग चौक मधून पळसपुर मार्गावरील रस्त्यावर नालीचे दुर्गंधीयुक्त पाणी जमा होऊन परिसरात साथीचे आजार पसरत आहेत. मागील सहा महिन्यापासून याची माहिती देऊनहीं नगरपंचायत प्रशासन थातूरमातूर पद्धतीने नाल्या उपसून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत आहे. यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी लाकडाचे फारोळे टाकून रस्ता बंद करत कुंभकर्ण झोपतील प्रशासकीय यंत्रणेला जाग करण्याचा प्रयत्न केला. जोपर्यंत नालीची उंची वाढवून सांडपाण्याची वाट मोकळी करून देत रस्ता सुरळीत करून दिला जात नाही तोपर्यंत गणेश विसर्जन करणार नाही असा पवित्र घेतला आहे.



हिमायतनगर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्रमांक एक मधील शहरातील बजरंग व चौक परिसरात गेल्या अनेक महिण्यापासून थेट मुख्य रस्त्यावर गटाराचे पाणी जमा होत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो आहे. धार्मिक कार्याला व शालेय विद्यार्थ्यांना या पाण्यातून ये जा करावी लागत आहे. यावेळी एखाद्या वाहन गेले तर घाण थेट नागरिकांच्या अंगावर पडत असल्याने दुर्गंधीचा सामना करण्याची वेळ आली आहे. नाल्याचा उपसा होत नसल्याने घाण पाण्यात अळ्यांची व डासांची उत्पत्ती होऊन नागरिक आजारी पडत आहेत. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी रस्त्यावर चक्क लाकडाचे फारोळे टाकून रस्ता बंद केला होता.


याची दखल घेऊन नगरपंचायत विभागाने गुरुवार दिनांक 12 रोजी रस्त्यावरील घाण साफ करण्याचा नावाखाली थातूर माथूर सफाई करून जात असल्याने नागरिक आक्रमक झाले. यावेळी नालीचे रुंदीकरण करून येथे पूल बांधण्यात यावा व झिरो लेव्हल काढून विसर्जन मिरवणुकीचा रस्ता सुरळीत करा नाहीतर गणेश विसर्जन करणार नाही असा पवित्रा घेतला.



याची माहिती मिळतात नगरपंचायत विभागाचे ओएस चंद्रशेखर महाजन, अभियंता नरेश काटकर, पोलीस निरीक्षक अमोल यांनी भेट देऊन नागरिक व गणेशभक्त युवकांना समजून सांगून जुनी नाली फोडुन नवीन नाली व पूल करून झिरो लेव्हल काढून गणेश मूर्ती जाण्याचा मार्ग मोकळा करूंन देण्याचे आश्वासन दिले आहे. गणेश विसर्जनाला अवघे पाच दिवस शिल्लक असताना आता नगरपंचायत दिलेल्या आश्वासनानुसार दुर्गंधीयुक्त नालीची समस्या सोडून गणेश विसर्जनाचा मार्ग मोकळा करून देतील की….? की येेरे माझ्या मागल्या मागण्याप्रमाणे दुर्लक्ष करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



