हिमायतनगर| हिमायतनगर भोकर या राष्ट्रीय महामार्गावरील अहसील कार्यालयाजवळ असलेल्या दिवाणी न्यायालय हिमायतनगरच्या नूतन इमारतीचा प्रथम वर्धापन दिन आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी साजरा करण्यात आला.


नूतन इमारतीला वर्ष झाले आहे, त्यानिमित्ताने अभिवक्तता संघाचे माजी अध्यक्ष राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथम वर्धापन दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी अभिवक्ता संघ हिमायतनगरचे उपाध्यक्ष ऍड. किरणकुमार नंदकुमार गुंडाळे, सचिव एडवोकेट श्रीराम शिंदे, अभिवक्ता संघाचे सदस्य व पदाधिकारी ऍड.अरविंद सोळंके साहेब, एडवोकेट संदेश कोठेकर साहेब, एडवोकेट नवीन ठाकूर साहेब, एडवोकेट जब्बार उपस्थित होते.




