श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| पंचायत समिती माहूर येथील कनिष्ठ सहाय्यक तथा कर्मचारी युनियनचे तालुकाध्यक्ष जयराम केंद्रे यांच्या कार्यालयीन कामाची दखल घेऊन दैनिक समीक्षा, मंथन ग्रुप व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उत्कृष्ट व गुणवंत अधिकारी कर्मचारी व शिक्षकांचा सन्मान सोहळा दिनांक 5 सप्टेंबर रोजी हॉटेल राजयोग नांदेड येथे उत्साहात संपन्न झाला. याच कार्यक्रमांमध्ये जयराम केंद्रे यांचा उत्कृष्ट व गुणवंत कर्मचारी म्हणून सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित जिल्हा पोलीस अधीक्षक श्री अबिनाश कुमार यांच्या हस्ते जयराम केंद्र यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी श्री शिवानंद मिनगिरे (सहा. आयुक्त समाज कल्याण), श्री प्रवीण टाके (जिल्हा माहिती अधिकारी),श्री केशव घोणसे पाटील (मुख्य संपादक, दैनिक गोदातीर), महाराष्ट्रातील प्रख्यात गवळण गायिका श्रीमती राधाबाई मुंडे (परळी), कार्यक्रमाचे संयोजक श्री रुपेश पाडमुख (संपादक दैनिक समीक्षा),रामेश्वर धुमाळ, धनंजय गुम्मलवार (अध्यक्ष जिल्हा परिषद कर्मचारी युनियन) यांच्यासह असंख्य अधिकारी, कर्मचारी,शिक्षक, मुख्याध्यापक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. जयराम केंद्रे यांना मिळालेल्या सन्मानाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.