HomeकृषीOsmannagar area ; उस्माननगर परिसरात पावसामुळे शेतात पाणीच पाणी , पिकांचे नुकसान...

Osmannagar area ; उस्माननगर परिसरात पावसामुळे शेतात पाणीच पाणी , पिकांचे नुकसान – NNL

उस्माननगर, माणिक भिसे | शनिवारच्या मध्यरात्री पासून जोरदार पावसाने हजेरी लावली होती. रविवारीही दिवसभर पावसाने झोडपले दोन तीन दिवस झालेल्या संततधार व जोरदार पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे शेतात पाणीच पाणी झाल्याने खरिपाचे पिके खरडून गेली असल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. जिल्ह्यासह उस्माननगर परिसरात झालेल्या अतिवृष्टीने व पुरामुळे अनेकांची शेती खरडून व सखल भागातील पिकात पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे .

परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे घरांची ही पडझड झाली आहे. ‌‌ कंधार तालुक्यातील उस्माननगर सह परिसरात रविवारी दि. १ रोजी झालेल्या संततधार पावसामुळे शेतशिवारात पाणीच पाणी चहूकडे झाल्याने खरिपाचे पिक पाण्याने खरडून नेले आहे. या पावसामुळे परिसरात पुरपरिस्थितीने नदी नाल्यांना पूर येऊन जमिनी खरडून, व सखल भागातील शेतातील पिकात पाणी साचून परिसरातील शिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments