HomeनांदेडBail denied to bogus doctor in Sarasam's botched abortion attempt : सरसम...

Bail denied to bogus doctor in Sarasam’s botched abortion attempt : सरसम येथील अवैद्य गर्भपात प्रयत्नातील त्या बोगस डॉक्टरचा अटकपुर्व जामीन नामंजुर -NNL

हिमायतनगर| तालुक्यातील सरसम येथे गैर मार्गाने अवैद्य रित्या गर्भपात करण्यात येत असल्याच्या माहिती वरून आरोग्य विभाग पोलिसांनी केलेल्या कारवाईत संशयीत आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी फरार असल्याने जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथे अटकपुर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने सदर आरोपीचा अटकपुर्व जामीन नामंजुर केला आहे.

सरसम येथिल सुरेखाई नगर भागात अवैद्य रित्य बनावट वैद्यकिय व्यवसायीका कडुन गर्भपात केला जात असल्याची माहिती काहि दिवसापुर्वी सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी वैभव नखाते यांना मिळाली होती. बनावट वैद्यकिय व्यवसायीकाच्या हालचालीवर लक्ष ठेवुन असतांनाच दि. १३ ऑगष्टला या भागातील अवैद्य गर्भपाताचा संशय बळावल्याने सरसम प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. वैभव नखाते यांनी कारवाई केली.

garbhapat 1 Bail denied to bogus doctor in Sarasam's botched abortion attempt : सरसम येथील अवैद्य गर्भपात प्रयत्नातील त्या बोगस डॉक्टरचा अटकपुर्व जामीन नामंजुर -NNL

दरम्यान संबंधितास सुगावा लागल्याने बनावट वैद्यकिय व्यवसाईकासह गर्भपात करण्याकरीता आलेल्या दोन महिला, एक मुलगी या ठिकाहुन पसार झाल्या, संबंधीत घराची तपासणी केली असता गर्भपाता करीता वापरले जाणारे Mtp किट, भुल देण्याचे इंजक्शन, सर्जिकल साहित्य मिळुन आले डॉ. वैभव नखाते यांनी दिलेल्या फिर्यादि वरून प्रथम खबरी अहवाल क्र. २१३/२०२४ नुसार संशयीत आरोपी पंडीत काळुराम वाठोरे याचे विरूध्द भारतीय नागरीक सुरक्षा संहितेचे कलम ४८२, भारतीय न्याय संहितेचे कलम ८८ , ६३ , ३ (५) , महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसायीक कायदा कलम ३३ (अ) , ३३ (२) नुसार गुन्हा दाखल झाल्या पासुन आरोपी फरार आहे. पोलिसां कडुन आरोपीचे शोध कार्य सुरू असतांना दरम्यान आरोपीचे वकील विधितज्ञ कदम यांनी जिल्हा व सत्र न्यायालय भोकर येथे अटकपुर्व जामीन मिळण्याचा अर्ज केला होता परंतु न्यायालयाने अटकपुर्व जामीन नामंजुर केला.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments