Ardhapur police seized : अर्धापुर पोलिसांनी संशयीत राशेनचा तांदुळ व ट्रक असा 17 लक्ष 96 हजार 485 रुपयाचा मुद्देमाल घेतला ताब्यात -NNL

नांदेड| अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड यांनी, जिवनावश्यक वस्तु कायदा नुसार कार्यवाही करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहितीद्वारे अर्धापुर पोलिसांनी संशयीत राशेनचा तांदुळ व ट्रक असा 17 लक्ष 96 हजार 485 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. या कार्यवाहीमुळे शासकीय धान्याचा काळाबाजार करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या ट्रकमधील तांदुळ हा राशेनचा आहे कि नाही याची खात्री पुढील कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, गेल्या काही दिवसा पूर्वी पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी अवैद्य धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहे. त्या अनुषंगाने (Operation flush out) अंतर्गत पोनि श्री चंद्रकांत कदम, पोस्टे लोहा यांचे मार्गदर्शनाखाली पथकातील पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार हे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याकरीता शासकीय जीप क्रमांक एमएच-26/आर-0525 वाहनामध्ये पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदारां मार्फत माहीती मिळाली की, एका ट्रक मध्ये तांदुळ भरून चोरटया बाजारात विक्री करण्याकरीता नेत आहेत.


या खात्रीशीर माहीतीवरून पोलीस अधीकारी व पोलीस अंमलदार यांनी सदर संशयीत ट्रक यास थांबुन तपासणी केली असता आत तांदुळ असल्याचे दिसुन आले. संबधीत ट्रकच्या चालकास सदर तांदळाच्या कागदपत्रा बाबत चौकशी केली असता कोणतेही कागदपत्र दाखवले नसल्यामुळे सदर ट्रक क्रमांक एमएच-22/केए-3396 किंमती 10,00,000/-रू व त्यातील संशयीत राशनचा तांदुळ किंमती 7.96.485/-रू असा एकुण 17,96,485/-रू चा मुद्देमाल मिळुन आला. सदरचा मुद्देमाल ताब्यात घेवुन पोस्टेला आणण्यात आले असून, या ट्रकमधील तांदुळ हा राशेनचा आहे किंवा कसे या बाबत पुरवठा विभागला पत्रव्यवाहर करून पुढील कायदेशिर कार्यवाही करण्याचे आदेश पोउपनि सुरेश भोसले, पोस्टे अर्धापुर यांना दिले आहेत.


सदरची कामगीरी अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक नांदेड, खंडेराय धरणे, अपर पोलीस अधीक्षक भोकर, डॅनियल बेन, उपविभागीय पोलीस अधीकारी उपविभाग नांदेड ग्रामीण यांचे मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रकांत कदम, पोहेकों विजय आडे, पोकों महेंद्र डांगे, विजय कदम सर्व नेमणुक पोस्टे अर्धापुर तसेच मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे पथक क्रमांक 06 मधील पोउपनि श्री प्रविण हलसे, पोहेकों ब्राम्हानंद लामतुरे, पोकों राम मुळे, महाचंद्रमुणी कांबळे, व चालक पोहेकॉ पंढरी जाधव, यांनी पार पाडुन चांगली कामगीरी केली आहे. वरिष्ठांनी त्यांचे अभिनंद केले आहे.



