Homeनांदेडपत्रकाराला बेदम मारहाण झाल्याची खोटी अफवा प्रसारित करणार्‍यावर कारवाई करा -NNL

पत्रकाराला बेदम मारहाण झाल्याची खोटी अफवा प्रसारित करणार्‍यावर कारवाई करा -NNL

किनवट, परमेश्वर पेशवे। पत्रकार हा संविधानाचा चौथा आधारस्तंभ असून पत्रकारांच्या सामाजिक कार्यामुळे सविधान जिवंत आहे.भारताच्या इतिहासात पत्रकारांनी नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या कार्यामुळे कानाकोपऱ्यातील गोष्टी जगापर्यंत माहित होत असतात.

ऐवढेच नाही तर गोर गरीबाच्या न्याय हक्कासाठी सर्वात सर्वप्रथम पञकारच असतात असे असतांना समाजातील काही समाज कंटक वृत्तीची जमात माञ पञकारावर नजर ठेवून त्यांना समाजात बदनाम करुण त्यांच्या मुसक्या अवळ्याचे काम करत असतात असाच काहीसा प्रकार माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील कैलास शंकरराव बेहेरे या इसमाने दि.२६ आॅगष्ट रोजी व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून केला आहे.त्यात त्याने ‘काल वाई (बाजार)च्या एका पञकाराने बेदम मार खाल्ला’असा मजकुर ठाकून छायाचिञ जोडले होते.परंतु सदरील प्रकार हा पत्रकारांची प्रतिमा मलीन करण्याची असल्याने स्थानिकच्या पञकारांनी या बाबत सिंदखेड पोलीस ठाण्याला रितसर तक्रार देवून सदरील इसमावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

सविस्तर वृत्त असे की,माहूर तालुक्यातील मौजे वाई बाजार येथील कैलास बेहेरे या इसमाने दि.२६ आॅगष्ट २०२४ रोजी त्याच्या वैयक्तिक व्हाट्सअप नंबर वरुण प्रेस माहूर/किनवट,पञकार/प्रशासन मिञ,किनवट/माहूर युवा ग्रामिण पञकार, डब्लू.सी. सी.डब्लू यासह अनेक व्हाट्सअप ग्रुपवर ‘काल वाई (बाजार)च्या एका पञकाराने बेदम मार खाल्ला’ असा मजकुर व छायाचिञ प्रसारीत केला होता.त्यामुळे किनवट-माहूर पञकारीता क्षेञात मोठी नाराजी पसरली आहे.सदरील घटना ही पञकारांच्या प्रतिष्ठेला बदनाम करणारी होती त्यामुळे समाजात काम करणाऱ्या सर्व पत्रकारांची प्रतिमा मलीन झाली आहे.या घटनेने दोन्ही तालुक्यातून  सोशल मिडीयाच्या माध्यमातून मोठा निषेध ही व्यक्त केला जात आहे.ऐवढेच नव्हे तर सदरील घटना नेमकी काय आहे ? जर या घटनेबाबत सिंदखेड पोलीस ठाण्यात एखादा गुन्हा दाखल असेल तर हरकत नसावी परंतु जर अशी घटना घडली नसेल व नाहक पत्रकारांना बदनाम करण्याच्या हेतूने अशा स्वरूपाची पोस्ट व्हायरल केल्या जात

सदरील इसमावर कायदेशीर कारवाई करून गुन्हा नोंद करण्यात यावा अन्यथा सदरील घटनेचा राज्यभर पडसाद उमटतील व सर्व स्तरावरून याचा निषेध नोंदवून प्रसंगी लोकशाही मार्गाने आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा तक्रारीतून दिला आहे.सदरील तक्रारीवर गोपाल खापर्डे,समाधान कांबळे,आदेश बेहेरे,प्रविण बर्डे,अनिल माडपिल्लेवार,राजु दराडे,शे.रफिक शे.अली,शंकर भालेराव,सुरेखा तळणकर,आकाश सातव,कार्तिक बेहेरे, प्रशांत शिंदे यांच्या साक्षर्‍या आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments