HomeनांदेडPrahar organization will take to the streets and protest : हिमायतनगर तालुक्यातील...

Prahar organization will take to the streets and protest : हिमायतनगर तालुक्यातील सर्व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी याना मुख्यालई राहणे बंधनकारक करा -NNL

हिमायतनगर| तालुक्यातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी, पंचायत समिती, तहसील कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय येथील कर्मचारी व अधिकारी हे मुख्यालयी न राहता सोयीच्या ठिकाणाहुन ये जा करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावं लागत आहे. हि बाब हेरून प्रहार संघटनेच्या वतीने आज तहसीलदार पल्लवी टेमकर याना निवेदन देऊन मुख्यालयी ना राहणार्यावर कार्यवाही करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे.

देण्यात आलेल्या निवेदन म्हंटले आहे की, हिमायतनगर तालुक्यातील ग्रामिण भागातील शेतकरी, शेतमजुर, दिव्यांग, निराधार, विधवा, अनाथ व शैक्षणिक विद्यार्थी यांचे अनेक कामे हे ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी हे त्यांना नेमुण दिलेल्या ठिकाणी राहात नसल्यामुळे अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. व त्यांच्या अभावी कांही जणांची कामे तशीच खोळंबुन आहेत. तर कांही विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले नसल्यामुळे शिक्षणांपासून वंचित सुध्दा राहावे लागलेले आहे.

हिमायतनगर तालुक्यातील ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी, तलाठी, मंडळ अधिकारी, समिती हिमा कृषि सहाय्यक, आरोग्य अधिकारी, व पंचायत समिती, तहसील कार्यालय, भुमी अभिलेख कार्यालय, येथील कर्मचारी व अधिकारी हे सुध्दा आपल्या सोयीनुसार रेल्वेच्या वेळापत्रकानुसार भोकर नांदेड – हिंगोली व त्यांच्या सोयीनुसार ये जा करीत आहेत, त्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील नागरीकांना, शेतकऱ्यांना, शेतमजुरांना व विद्यार्थ्यांना अत्यंत गैरसोयींना तोंड दयावे लागत आहे.

तरी वरील सर्व प्रकारची अडचण लक्षात घेऊन निवेदनाची योग्य ती दखल घेवून कार्यवाही करावी, अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करुन प्रहार जनशक्ती आंदोलन करेल असा इशाराही देण्यात आला आहे. या निवेदनाच्या प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नांदेड, उपविभागीय अधिकारी साहेब, हदगांव, गट विकास अधिकारी, पं. स. हिमायतनगर, तालुका कृषि अधिकारी, हिमायतनगर याना देण्यात आले आहे. या निवेदनावर प्रहार तालुकाध्यक्ष दत्ता पंडीतराव देशमुख, दत्ता तुकाराम आंबेपवाड,  संगपाल नामदेव प्रधान आदींसह अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments