Homeनांदेडमुदखेड येथे कत्तल खान्यावर छापा 59 गायी, 01 बैल व वासरे असे...

मुदखेड येथे कत्तल खान्यावर छापा 59 गायी, 01 बैल व वासरे असे एकुण 6,10,000/- रुपयाचे जनावरे जप्त -NNL

नांदेड। गुप्त बातमीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुदखेड येथे कत्तल खान्यावर छापा टाकून 59 गायी, 01 बैल व वासरे असे एकुण 6,10,000/- रुपयाचे जनावरे जप्त केली आहे, या कार्यवाही मुळें गोवंश कत्तलीसाठी नेणाऱ्या व डांबून ठेवणाऱ्या लोकमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दिनांक 27/08/2024 रोजी स्थागुशा, नांदेड येथील पोउपनि / मिलिंद सोनकांबळे यांचे पथकास गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, काही इसम मुदखेड येथे काही जनावरांना कत्तलखान्यात डांबुन ठेवले आहे. अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने त्यांनी सदरची माहीती वरीष्ठांना देवुन सोबत अमंलदार यांना घेवुन प्रॉपर मुदखेड शहरात कुरेशी मोहला परीसरात जावुन सापळा रचुन, टेकडी गल्ली कुरेशी मोहल्ला मुदखेड येथील 1) महम्मद निसार महम्मद मदार रा. टेकडी गल्ली कुरेशी मोहल्ला मुदखेड 2) महम्मद सदाम महम्मद महेबुब रा. टेकडी गल्ली कुरेशी मोहल्ला मुदखेड 3) महम्मद फेरोज महम्मद इस्माईल रा. टेकडी गल्ली कुरेशी मोहल्ला मुदखेड याचे टिन पत्र्याचे शेड मध्ये छापा मारला असता, नमुद ठिकाणी वेगवेगळ्या रंगाचे एकुण 59 गायी, वासरे व 01 बैल किंमती 6,10,000/- रुपयाचे मिळुन आले. नमुद ठिकाणी मिळुन आलेल्या वरील नमुद तिन्ही आरोपीतांना मिळुन आलेल्या गोवंश जनावराचे संबंधाने विचारपुस केली असता, त्यांनी मिळुन आलेले जनावरे कत्तलीसाठी आणले असल्याचे सांगीतलेने नमुद तिन आरोपी व त्यांना मदत करणारे, विक्री करणारे, इसमांविरुध्द पोलीस ठाणे मुदखेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु असुन मिळुन आलेल्या जनावरांना गोशाळा येथे जमा करण्यात आले आहे.

सदरची कामगिरी मा. श्री अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री सुरज गुरव, अपर पोलीस अधीक्षक, नांदेड, मा. श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक, भोकर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागूशा नांदेड, पोउपनि / मिलिंद सोनकांबळे, पोलीस अमंलदार माधव केंद्रे, बालाजी यादगीरवाड, शिवा ढवळे, विजय तोडसाम यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments