HomeकरियरHutatma Pansare College ; हुतात्मा पानसरे महाविद्यालय भरती प्रकरण - NNL

Hutatma Pansare College ; हुतात्मा पानसरे महाविद्यालय भरती प्रकरण – NNL

नांदेड| हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळ कुंडलवाडी संचलित हु. पानसरे महाविद्यालयातील भरती प्रकरण सद्या भलतेच गाजत असुन अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिध्दार्थ तलवारे यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक लातूर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर यंत्रणा अ‍ॅक्शन मोडवर आली आहे या भरती प्रकरणात बेकायदेशीर संचालक मंडळाकडून होणार्‍या प्रक्रियेबाबत नांदेडच्या सहायक धर्मादाय आयुक्तांना एका पत्राद्वारे नांदेडच्या शिक्षणाधिकार्‍यांनी अधिकृतेबाबत अहवाल मागविला आहे.

कुंडलवाडी येथील हुतात्मा गोविंदराव पानसरे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित हु.पानसरे महाविद्यालयात सद्या पवित्र पोर्टलद्वारे भरतीसाठी दि. 21, 22 आणि 23 रोजी मुलाखती झाल्या आहेत. यावर अन्याय प्रतिकार दलाचे संस्थापक सिध्दार्थ तलवारे यांनी संबंधितांकडे तक्रार केली होती, त्याची दखल घेत सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय तसेच नांदेडच्या माध्यमिक शिक्षण विभागाने हि कार्यवाही योग्य पध्दतीने करावी यासाठी 10 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा सिध्दार्थ तलवारे यांनी दिला आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments