नवीन नांदेड| भारतीय जनता पारतंत्र्यातुन मुक्त होऊन आज ७८ वर्षे पूर्ण झाली. लोकशाहीच्या माध्यमातून सर्वांना विकासाची संधी मिळाली. त्यामुळे व्यक्ती आणि पर्यायाने राष्ट्राची प्रगती झाली. असे असले तरी ज्या कुटुंबात अथवा समाजात आपण जन्माला आलो त्या कुटुंबाच्या आणि समाजाच्या प्रगतीसाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले पाहिजे.


आपल्या शिक्षणाचा तसेच ज्ञानाचा उपयोग करून आपण देशाच्या प्रगतीसाठी हातभार लावू शकतो. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपल्या मातृभूमीशी कृतज्ञ व क्रियाशील राहिले पाहिजे, असे प्रतिपादन श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कर्मयोगी डॉ.नानासाहेब जाधव यांनी केले.,येथील वसंतराव नाईक महाविद्यालयात ७८ व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. नानासाहेब जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ते बोलत होते.


या प्रसंगी सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त सौ.शांतादेवी जाधव,संस्थेचे कोषाध्यक्ष ॲड.श्रीनिवास जाधव, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार, जवाहरलाल नेहरु समाजकार्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसियोद्दीन मुजावर,उपप्राचार्य डॉ. व्ही. आर. राठोड, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. एन. पी. दिंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी उपस्थितांना भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त डॉ. व्यंकटेश देशमुख यांनी शपथ दिली. या नंतर मान्यवरांच्या उपस्थितीत स्वातंत्र्य दिनानिमित्त मराठी विभागाच्या वतीने ‘वसंतदर्पण’ या भित्तिपत्रकाच्या ‘भारतीय महिलांचे समाज सुधारणेतील योगदान’ या विशेषांकाचे अनावरण करण्यात आले.


यावेळी महाविद्यालयातील प्रो. डॉ. रेणुका मोरे , डॉ. प्रदीप बिरादार, प्रा. डॉ. जी. वेणुगोपाल, डॉ.अनिल गच्चे, डॉगणेश लिंगमपल्ले, डॉ. सुनिता गरुड, डॉ.नागेश कांबळे, कार्यालयीन अधीक्षक आर.डी. राठोड, डॉ.उत्तम कानवटे, डॉ.आर.एम .कागणे,डॉ.साहेबराव मोरे, डॉ. संतोष शिंदे,डॉ.साहेबराव शिंदे, डॉ. विजयकुमार मोरे, प्रा.कपील हिंगोले, प्रा.शशीकांत हाटकर,डॉ.लालबा खरात, डॉ.शोभा वाळुक्कर, डॉ. ललिता आय्या, प्रा.नितीन मुंडलोड, डॉ.सरोदे, डॉ.समाधान दराडे, डॉ. बुशरा शेख, प्रा. हाळे, डॉ.जगताप, प्रा.करण हांबर्डे यांसह महाविद्यालया तील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील उप प्राचार्य प्रा एन पी दिंडे यांच्या सह सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी यांची उपस्थिती होती.



