नवीन नांदेड| लोहा तालुक्यातील निर्मल ग्राम झरीचे माजी सरपंच माधवराव कामाजी पाटील झरीकर यांचे वृध्दपकाळाने राहत्या घरी झरी येथे १४ आगस्ट रोजी सकाळी १० वाजता निधन झाले असून निधन समयी त्याचे वय ६९ वर्ष होते, त्याचा पश्चात पत्नी,दोन मुले, दोन मुली, भाऊ बहिण असा परिवार असून सायंकाळी ५ वाजता झरी स्मशानभूमीत हजारो नागरीकाच्या उपस्थित शोकाकुल वातावरण मध्ये
अंत्यसंस्कार करण्यात आले.


लोहा तालुक्यातील झरी गावातील ग्रामपंचायत सरपंच म्हणून २००० ते २००५ सरपंच म्हणून माधवराव पाटील झरीकर यांनी सरपंच म्हणून कारभार सांभाळला तर पत्नी सुमनताई झरीकर यांनी २०१० पर्यंत सरपंच पद सांभाळले, या काळात राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते झरी गावाला निर्मल ग्रामपंचायत पुरस्कार घेतला तर शासनाच्या अनेक पुरस्कार ग्रामपंचायत यांना मिळवून दिले आहेत, सेवा सोसायटी चेअरमन म्हणून ही कारभार सांभाळला, स्वच्छता दुत म्हणून महाराष्ट्र शासनाच्या वतीने नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अनेक गावात प्रबोधनव्दारे अनेक गावात स्वच्छता मोहीम घेऊन निर्मल गावासाठी पुढाकार घेतला.


नांदेड जिल्हा काँग्रेस पक्ष खजिनदार म्हणून गेली अनेक वर्षे कामे केली होती तर सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेख निय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय, विभागीय, जिल्हा, तालुका व गावपातळीवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत. १४ आगस्ट रोजी सायंकाळी हजारो नागरीक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, सरपंच ,उपसरपंच, चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ, नागरीक व सामाजिक राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व परिवारातील सदस्य यांच्या उपस्थितीत सायंकाळी ५ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.



