हदगाव/हिमायतनगर| आगामी काळात होणारेय विधानसभा निवडणुकीच्या हालचालीने वेग घेतला आहे. त्या दृष्टीने काँग्रेसकडून हदगाव/हिमायतनगर विधानसभा मतदारसंघातुन निवडणूक लढविण्याची इच्छा हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुकाअध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांनी व्यक्त करत उमेदवारी मागितली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हदगाव विधानसभा मतदार संघातून नवखा उमेदवार म्हणून ते प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे.
प्रदेश काँग्रेस कमिटीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हदगाव मतदार संघातून इच्छुकांची चाचपणी सुरू झालेली आहे. पक्ष नवीन उमेदवाराच्या शोधात असल्याची चर्चा सुरु असतानाच हिमायतनगर तालुका काँग्रेस कमिटीचे माजी तालुका अध्यक्ष विकास पाटील देवसरकर यांचे नावे प्रामुख्याने घेतले जात आहे. युवक काँग्रेस पासून पक्षाशी जोडले गेलेले देवसरकर यांनी पक्षात आत्तापर्यंत विविध महत्वाच्या जबाबदा-या पार पाडलेल्या आहेत. त्यांच्या तालुका अध्यक्ष पदाच्या कार्यकाळात दोन वेळा विधानसभा, हिमायतनगर नगरपंचायत, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी-विक्री संघ आदीवर काँग्रेसला वर्चस्व राखता आले आहे.
त्यामुळे देवसरकर यांना संधी दिल्यास आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेसला नक्कीच विजयाची संधी राहील असे बोलल्या जात आहे. त्यांनी इच्छुक म्हणून अर्ज दाखल करताना नांदेड कॉंग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, हदगाव काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष बाबुराव पाथरडकर, शिक्षक सेलचे श्यामराव पाटील मनाठकर यांच्यासह अनेक कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणले कि, पक्ष कोणाला उमेदवार देईल हे आत्ताच सांगता येणार नाही, मात्र पक्षाचे कामे आणि नियमित बैठकांना उपस्थित आणि ध्येय धोरणे राखून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांस पक्ष संधी देत असते मला खातरी आहे कि पक्षाची उमेदवारीचा बिफॉर्म माझ्याच नावाला लागेल असेही ते म्हणाले .