Homeनांदेडस्वातंत्र्यदिनी " समता बालवैज्ञानिक " म्हणून सम्यक कांबळेचा होणार सन्मान - NNL

स्वातंत्र्यदिनी ” समता बालवैज्ञानिक ” म्हणून सम्यक कांबळेचा होणार सन्मान – NNL

उस्माननगर, माणिक भिसे| समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर ( मोठी लाठी ) ता.कंधार येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन शाबासकीची थाप दिली जाते. कै. विनायकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शालेय विद्यार्थी बाल वैज्ञानिक सम्यक लक्ष्मण कांबळे याचा २०२४ चा “समता वैज्ञानिक” म्हणून स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे संचालक प्रदीप देशमुख यांनी प्रतिनीधीशी बोलताना जाहीर केले आहे.

दरवर्षी समता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर (मोठी लाठी) ता.कंधार येथे दहावी , बारावी , शिष्यवृत्ती , व अन्य स्पर्धात्मक परीक्षेत घवघवीत यश मिळालेल्या आणि ज्यांनी शक्कल लढवून नाविन्यपूर्ण उपक्रम किंवा बनविले अशा विद्यार्थ्यांचा सत्कार करून शाबासकीची थाप दिली जाते.

२१ व्या शतकात भारत चंद्रावर पाऊल ठेवत आहे. देशात नवीन पिढी विविध प्रकारचे शोध लावताना पाहतोय ऐकतोय अशा प्रकारे उस्माननगर येथील समता विद्यालयातील दहावीतील विद्यार्थी बालवैज्ञानिक सम्यक लक्ष्मण कांबळे यांने कुलर व गाडी चालवताना चालकाला झोप येत असताना धोक्याची सुचना देणारे यंत्र तयार केले आहे.

त्याच्या शोधकार्याची दखल घेऊन संस्थेचे संचालक प्रदीप देशमुख यांनी यंदाच्या १५ ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्यदिनी कै. विनायकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ” समता वैज्ञानिक”२०२४ चा मानकरी सम्यक लक्ष्मण कांबळे हा ” बालवैज्ञानिक “म्हणून स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे कळविले आहे. यावेळी गावातील विविध मान्यवर , नागरिक विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन सत्कार करणार आहेत. पत्रकार संघाचे सचिव तथा संस्थेचे तरूण संचालक प्रदीप देशमुख हे नेहमी शाळेत विधायक उपक्रम राबविण्यासाठी उत्सुकतेने पुढे येतात.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments