हिंगोलीलाइफस्टाइल

behalf of tribal youth welfare : आदिवासी युवक कल्याणच्या वतीने जिल्हाधिकार्यालयासमोर आंदोलन -NNL

हिंगोली| जागतिक आदिवासी दिनानिमित्त, आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विशेष पदभरती व आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी भव्य उलगुलान आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना आदिवासी समाजाच्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी निवेदन देण्यात आले. उपस्थित समाज बांधवांना कळमनुरी मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते डॉ. रमेश मस्के (नाईक) यांनी मार्गदर्शन करून आदिवासी दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या व त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत त्यांच्यासोबत लढा देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी शिवसेना नेते डॉ. रमेश देवराव मस्के (नाईक) माजी आमदार संतोष टारफे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील सावंत, काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीपराव देसाई, शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, आदिवासी युवक कल्याण संघाचे हिंगोली जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते व मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव व जनसमुदाय उपस्थित होता.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button