लोहा| मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण मेळावा या धावपळीतून वेळ काढत लाभार्थ्यांचा दसरा सण गोड व्हावा यासाठी तहसीलदार परळीकर व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार मोकले , विभाग प्रमुख श्रीमती वैशाली एस चाटे मॅडम प्रयत्न केले संजय गांधी निराधार अनुदान योजना ,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती, योजनेतील ९ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात तीन महिन्याचे एकूण ३ कोटी ८६ लक्ष ७७ ,हजार २०० रुपये इतकेअनुदान जमा झाले आहे.त्यामुळे या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
लोहा तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना प्रभावीपणे राबविण्यात येते .सणासुदीला वेळेवर लाभार्थ्यांना अनुदान मिळावे यासाठी नेहमीच हा विभाग तत्पर राहिला आहे. एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असतानाच संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजनाइंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धोपकाळ निवृत्ती योजनेच्या लाभार्थ्यांना आपले अनुदान कधी मिळणार याकडे लक्ष लागले होते. त्यातच सणासुदीचे दिवस सुरू झाले. दसरा सणाच्या पूर्व संध्येला लोहा तालुक्यातील उपरोक्त तिन्ही योजनेतील ९ हजार लाभार्थ्यांच्या खात्याचे जुलै ,ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्याचे अनुदान जमा झाले आहे.
तालुक्यातील या सर्व म्हणजे ९ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात ३ कोटी ८६, लक्ष ७७हजार रूपये जमा झाले आहेत. तहसीलदार विठ्ठल परळीकर यांनी लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळावे यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत. यावेळी दसरा सण गोड झाला आहे. विभागाचे नायब तहसीलदार अशोक मोकले, विभाग प्रमुख वैशाली एस चाटे मॅडम, संगणक ऑपरेटर मळगे यांनी परिश्रम घेतले व निराधाराचा दसरा गोड केला आहे.
संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, इंदिरा गांधी वृद्धोपकाळ या योजनेचे लाभार्थ्यांना महाडीबीटीद्वारे अनुदान वाटप करण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाने तसे निर्देश दिले आहेत. आधार कार्ड, बँक पासबुक व सुरू असलेला मोबाईल क्रमांक जो की संलग्न आहे. ही कागदपत्रे तहसील कार्यालयात ज्यांनी अद्याप दिली नाहीत त्यांनी आणून द्यावीत जेणे करून पुढील अनुदान वाटप करताना अडचण होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन तहसीलदार परळीकर यांनी केले आहे/