9 thousand beneficiaries : लोहा तालुक्यातील ९ हजार “संगानि” योजनेच्या लाभार्थ्यांचा दसरा गोड; ३ कोटी ८६ लक्ष रुपये खात्यात जमा -NNL
लोहा| मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, महिला सशक्तीकरण मेळावा या धावपळीतून वेळ काढत लाभार्थ्यांचा दसरा सण गोड व्हावा यासाठी तहसीलदार परळीकर व संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार मोकले , विभाग प्रमुख श्रीमती वैशाली एस चाटे मॅडम प्रयत्न केले संजय गांधी निराधार अनुदान योजना ,श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धपकाळ निवृत्ती, योजनेतील ९ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात तीन महिन्याचे एकूण ३ कोटी ८६ लक्ष ७७ ,हजार २०० रुपये इतकेअनुदान जमा झाले आहे.त्यामुळे या लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
लोहा तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार योजना प्रभावीपणे राबविण्यात येते .सणासुदीला वेळेवर लाभार्थ्यांना अनुदान मिळावे यासाठी नेहमीच हा विभाग तत्पर राहिला आहे. एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत असतानाच संजय गांधी निराधार अनुदान योजना,...
