श्री क्षेत्र माहूर l सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालय, मुंबई यांनी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना तसेच राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डि.बी.टी. द्वारे करण्याचा निर्णय घेण्यात आला आल्याने. या योजनेत पात्र ठरलेल्या प्रकरणातील तिघांच्या वारसाना प्रत्येकी 20000 असे 60 हजाराचे अनुदान देण्यात आलेली माहिती तहसीलदार किशोर यादव यांनी दिली आहे


शासन निर्णय क्रमांक : राकुला-2012/प्र.क्र.277/विसयो-2, मंत्रालय मुंबई, दि. 21 नोव्हेंबर 2013 अन्ध्ये दारिद्रय रेषेखाली नोंद असलेल्या कुटूंबातील 18 ते 59 वयोगटातील कोणतीही कमावती व्यक्ती मृत्यू पावल्यास त्यांच्या कुटूंबियास राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजने अंतर्गत लाभ देण्यात येतो.


त्यानुषंगाने माहूर तहसिल कार्यालयात प्राप्त झालेल्या अर्जानुसार 3 पात्र लाभार्थ्यांना (1. गोदावरी संदीप रसाळे रा. हडसणी, 2. करुणाबाई वसंत खडके रा. बोरवाडी, 3. सुशीला गंगाराम पेटकुले रा. सिंदखेड प्रत्येकी रु.20000/- याप्रमाणे रु. 60000/- चे अनुदान पी एफ एम एस प्रणालीद्वारे त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार किशोर यादव यांनी दिली आहे. तसेच माहूर तालुक्यातील पात्र लाभार्थ्यांनी योग्स त्या कागदपत्राची पुर्तता करुन राष्ट्रीय कुटूंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याचे आवाहन केले आहे. याकामी संगांयो विभागाचे नायब तहसिलदार डॉ. राजकुमार राठोड, महसूल सहायक वैभव पांढरे, आय. टी. असिस्टंट उदय वानखेडे यांनी परिश्रम घेतले.
