नांदेड| भीम जयंतीचे औचित्य साधून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर यांच्या वतीने सोमवारी २४व्या वर्षीची लोकनेते गोपीनाथराव मुंडे पाणपोई सुरु करण्यात आली. तसेच भाजपा नामफलकाचे अनावरण व जयंती मिरवणुकीतील लाडक्या बहिणींना लेडीज पर्स वाटप यांचा शुभारंभ ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शिवप्रसाद राठी यांच्या हस्ते झाले.


गेल्या २३ वर्षांपासून ॲड. दिलीप ठाकूर हे वाघी-नाळेश्वर सर्कल परिसरातील १६ गावांमधील प्रवाशांसाठी व मिलरोड वसाहतीसाठी उन्हाळ्यात पाणपोई सुरू करून समाजसेवेचा वसा जोपासत आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण,खा.डॉ. अजित गोपछडे, संघटन मंत्री संजय कोडगे,भाजप महानगराध्यक्ष अमरनाथ राजुरकर, भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. संतुकराव हंबर्डे व ॲड. किशोर देशमुख, लायन्सचे नवनिर्वाचित उपप्रांतपाल योगेश जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली भीमजयंती साजरी करण्यात आली.सुरुवातीला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकनेते कै. गोपीनाथ मुंडे, कै. गोपालसिंह ठाकूर, मातोश्री कै. वनमाला ठाकूर, कै. ॲड. श्याम जाधव, कै. बिरजू यादव, कै.लक्ष्मीबाई भुसेवाड यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक करताना ॲड. ठाकूर यांनी उपक्रमाची भूमिका स्पष्ट केली.


मान्यवरांनी केले कौतुक
शिवप्रसाद राठी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले, “उन्हाळ्यात तहानलेल्याला थंड पाणी मिळणे ही खरी सेवा आहे. त्यामुळे ठिकठिकाणी अशा पाणपोया सुरू होणे गरजेचे आहे.”राजेश यादव यांनी दिलीप ठाकूर यांच्या “कायापालट ” उपक्रमांची माहिती देताना, अन्नदान, चप्पल वाटप, छत्री वितरण, ब्लँकेट सेवा आदी कार्यांचा उल्लेख केला. आजवर देशभरातून त्यांना ९९ पुरस्कार प्राप्त झाले आहेत, हे विशेष! कार्यक्रमात भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दीपकसिंह ठाकूर, गाडेगावचे सरपंच गजानन उबाळे, कोंडीबा बनसोडे, गोपाळ वाघमारे यांनीही मनोगत व्यक्त करतांना दिलीप ठाकूर यांच्या कार्याचे कौतुक केले.नगरसेवक असतांना सुरु केलेली पाणपोई पद गेल्यानंतरही उपक्रम सतत सुरू ठेवणाऱ्या ॲड. ठाकूर यांना धन्यवाद दिले.सूत्रसंचालन दिनेशसिंह ठाकूर यांनी केले तर आभार प्रदर्शन राहुल बनसोडे यांनी केले.


लाडक्या बहिणी खुश
यावेळी लेडीज पर्स वाटप झाल्यामुळे मिरवणुकीतील लाडक्या बहिणी विशेष आनंदित झाल्या.या उपक्रमासाठी राजेशसिंह ठाकूर, नंदलाल यादव, संतोष सोने,बिरबल यादव, मुंजाजी पाचकोर,साईनाथ शेट्टे, किशोर लोंढे,राजू बनसोडे,बबन गायकवाड, नरसिंह द्रोपतीवार,संतोष भारती,कपिल यादव, कैलास बरंडवाल यांनी विशेष मेहनत घेतली.


