वाढत्या घटनांचे पोलिसांच्या समोर मोठे आव्हान
आ चिखलीकर यांची जैन मंदिरास भेट पोलिसांना सूचना
लोहा| लोहा शहरातील देऊळ गल्ली भागात असलेल्या वृषभनाथ दिगंबर जैन मंदिरात दिनांक ११ तारखेला भल्या सकाळी साडेबारा वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिराचे कुलूप तोडून आतील दानपेटी फोडली. त्यातील २ किलो चांदीचे दागिने व ३५ हजाराची रोख रक्कम चोरट्यांनी पळवली. सदरील घटनेप्रकरणी जैन मंदिराचे विश्वस्त यांनी लोहा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. श्वान पथक व ठसे तज्ज्ञाकडून तपास आणि डीवायएसपी डॉ अश्विनी जगताप, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांनी भेट देऊन सूचना दिल्या. तर रात्रीला नांदेडच्या स्थागुशा पथकाने घटनास्थळ पाहणी केली.


लोहा शहरात मागील काही दिवसांपासून चोरांच्या घटनेत कमालीची वाढ झाली आहे. पोलिसांची गस्त मुख्य रस्त्याने असते पण पूर्वी कलाल पेठ, भोईगल्ली, मारुती मंदिर, नवी आबादी या जुन्या शहरात तसेच जायकवाडी भागात पोलिसांची रात्र गस्त असल्याचे राष्ट्रीय महामार्ग बायपास झाल्यामुळे जुन्या शहरात चोरटे येण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शहराच्या अनेक भागात चोर येत असल्याची चर्चा आहे. याकडे पोलिसांनी गांभीर्याने पाहणे आवश्यक असून, शिवाय गल्लोगल्ली युवकांचीरात्रगस्त पथके निर्माण करण्यावर भर दिला तर पोलिसांना मदत होणार आहे.


शहरातील शिवकल्याण नगर भाग परिसरालगत असलेल्या नूतन वसाहतीत घरासमोर ठेवलेली मोटार सायकल चोरट्यांनी पळवली होती. त्यानंतर ११ तारखेला मध्य पहाटे साडेबारा वाजताच्या दरम्यान अद्यात चोरट्यांनी -देऊळ गल्ली भागातील वृषभनाथ दिगंबर जैन मंदिरात कुलूप तोडून आत प्रवेश केल कपाट फोडून फोडले आतील दानपेटी तोडली. त्यातील २ किलो चांदीचे दागिने व पेटीतील ३५ हजाराची रोख रक्कम लंपास केले. सदरील घटना जैन समाजातील नागरिकांच्या लक्षात येताच जैन मंदिर परिसरात जैन बांधवांनी गर्दी केली. घटनास्थळास लोहा पोलिसांनी भेट देऊन पहाणी केली. तसेच श्वान पथकास तसेच ठसे तज्ज्ञांशी पाचारण करण्यात आले होते.


अहमदपूर (जि लातूर) येथेही चोरीची घटना त्याच रात्री घडल्यामुळे लातूर स्थागुशाचे पथक लोह्यात येऊन पाहणी करून गेले. तसेच घटनास्थळा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अश्विनी जगताप, पो.नि. नागनाथ आयलाने, पोलिस उपनिरीक्षक मारोती सोनकांबळे, पो कॉ प्रदीप शेंबाळे, सदाशिव जामकर आदींनी भेट दिली घटनेचा पंचनामा केला..शोधार्थ पथके तयार केली. सदर घटनेप्रकरणी जैन मंदिराच्या विश्वस्ताने लोहा पोलिसात तक्रार दिली व पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

चोरीच्या घटनेनंतर स्थागूशाची पाहणी
लोहा शहरातील जैन मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेनंतर चोरांना पकडण्याचे पोलीस समोर मोठे आव्हान उभे आहे. रात्रीसाडे सात वाजण्याच्या सुमारास स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रवी वाहूळे, पोलीस उपनिरीक्षक बळीराम दासरे, एएसआय गुंडेराव करले, पोहेकॉ देविदास चव्हाण, पो कॉ मोतीराम पवार याच्या पथकाने घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली व तपास सुरु केला आहे.
आमदार चिखलीकर यांची जैन मंदिरास भेट
शहरातील देऊळ गल्ली मध्ये असलेल्या जैन मंदिरात गुरुवारी भल्या पहाटे चोरी झाली. शुक्रवारी (ता १२,) आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी मंदिरात जाऊन पु्र्ण माहीती घेतली. जैन बांधवांशी संवाद साधला चोरांचा लवकर शोध घ्यावा असा सूचना दिल्या.


