हदगाव, शेख चांदपाशा| उर्ध्व पेनगंगा प्रकल्पांतर्गत ईसापुर धरणावरून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला असून, इसापूर धरण पूर नियंत्रण प्रशासनाने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या जयपूर बंधाऱ्यातून वाढता पाण्याचा विसर्ग पाहता, धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.


धरण प्रशासनाचा निर्णय – आज दि. 18 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 3.30 वाजता धरणातील 3 गेट्स पूर्वीच्या 1.50 मीटर वरून थेट 2 मीटर पर्यंत उघडण्यात आले. याशिवाय, धरणाच्या सांडव्यावरील 10 गेट्स प्रत्येकी 1.50 मीटर ने उघडे ठेवण्यात आले आहेत.अशा प्रकारे एकूण 13 दरवाजा मधून नदीपात्रात 68,328 क्युसेक्स (1934.803 क्युमेक्स) इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्याची परिस्थिती धरणातील पाण्याची आवक सतत सुरू असून, तिच्या वेगानुसार पुढील काही तासांत विसर्ग वाढवणे अथवा कमी करणे बाबत प्रशासन निर्णय घेणार आहे. अस संबधीत विभागाने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


शनिवारी रात्री पासून 13 दरवाजे उघडण्यात आले असून, हदगाव तालुक्यातील नदीकाठच्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे अनेक पिके जलमय झाले असून त्या क्षेत्रातील तूर हळद सोयाबीन कापूस उडीद ऊस या पिकाचे नुकसान झाले. नदीकाठावरील गावातील नागरिकांनी विशेषता शेतक-यांनी खबरदारी घ्यावी असे अहवान करण्यात आले असून, पेनगंगा नदीपात्रात अनावश्यकपणे जाऊ नये.


शेतकरी, पशुपालक तसेच नदीकाठच्या वस्त्यांतील नागरिकांनी स्वतःची व जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. पूरपरिस्थिती उद्भवू शकणाऱ्या गावांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात.गेल्या काही दिवसांत झालेल्या सततच्या पावसामुळे धरणातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. वरच्या धरणांतून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे इसापूर धरणाच्या पातळीत वाढ होत आहे. त्यामुळे नदीकाठावरील खेड्यांना पुराचा धोका संभवतो असा इशाराही देण्यात आला आहे.

सर्वसामान्यांची नाराजी….नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांची पूरग्रस्त भागाला भेट हवी…!
हदगाव तालुक्यात ढगफूटी अतिवृष्टी झाली की, तेव्हा विविध राजकीय पक्षाचे नेते अतिवृष्टीच्या भागात येतात भरघोस तालूका जिल्हयाच्या व राज्याच्या प्रशासनाच्या प्रमुखांना थेट बोलतात. प्रशासानाचे बडे अधिकारी ही हो साहेब म्हणतात. मात्र प्रत्यक्षात कृती फारशी दिसून येत नाही हे सर्वसामान्य पिडीत नागरिक त्रस्त शेतकरी नागरिक यांच्या बोलण्यावर दिसून आलं. विशेष म्हणजे नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री यांचं अद्यापही कोणत्याही प्रकारचं आश्वासन दिल्याचे दिसून आले नाही हे उल्लेखनीय.
