लोहा| लोहा शहर व तालुक्याच्या राजकारणात ज्यांची कधीच साधी ओळख नव्हती. केवक आणि केवळ जिल्ह्याचे खा चिखलीकर साहेब यांच्यामुळे ज्यांना दोन वेळा गुलाल लागला. त्या शरद पवार यांची लोह्यात किती किंमत आहे हे सगळ्यांना ज्ञात आहे. त्यांनी उगीच प्रसिद्धीसाठी उचलली जीभ टाळला लावू नये असा सल्ला नगर पालिकेचे माजी सभापती आप्पाराव पाटील पवार यांनी दिला.
लोहा शहर बाय पास टू बाय पास या करिता जिल्ह्याचे खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी ३५कोटी रुपये मंजूर केले .या शहरातील सर्व जनतेला ज्ञात आहे. चिखलीकर साहेबांच्या आशिर्वादाने शरद पवार दोनदा नगरसेवक झाले उपनगराध्यक्ष झाले. यापूर्वी ते कधीच नगर पालिकेत निवडून आले नाहीत. उपजिल्हा प्रमुख, भाजपा तालुकाध्यक्ष, लोहा नगर पालिका उपाध्यक्ष हे पद काय शरद पवार यांनी स्वकर्तुत्वाने मिळविले नाही.
तर ही देणं चिखलीकर साहेबांची होती. २००३ ची नगर पालिकेत निवडूक आठवा (?) आणि २००८ मध्ये चिखलीकर साहेबांकडे आल्यानंतरचा काळ आठवा (?) काय कर्तृत्व होते. हे सगळं केवल चिखलीकर साहेबांचे उपकार आहेत हे शहरातील व तालुक्यातील सर्व जनतेला माहिती आहे असेही नगर पालिकेचे माजी सभापती आप्पाराव पाटील पवार यांनी म्हंटले आहे.