नांदेड, अनिल मादसवार। दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिल्हा परिषद नांदेडतर्फे तीर्थक्षत्र माळेगाव यात्रेचे नियोजन करण्यात आले असून दिनांक 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर 2022 दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहीती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे, पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे, नरेगाचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक व्ही.आर.पाटील यांची यावेळी उपस्थिती होती.
दुपारी 3 वाजता महिला व बालकांसाठी स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार शामसुंदर शिंदे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून आमदार बालाजीराव कल्याणकर, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार जितेश अंतापुरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक वर्षा ठाकूर-घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकुळे, पंचायत विभागाच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव-कापसे, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेखच्या सुरेखा सेठिया, महिला व बालकल्याण विभागाच्या जिल्हा कार्यक्रम अधिकारी आर.पी. काळम, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, अर्धापूरच्या गट विकास अधिकारी अर्धापूर एम.जे. रावताळे यांची उपस्थिती राहणार आहे.
सायंकाळी 4 वाजता भव्य कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन व कृषीनिष्ठ शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात असून खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या शुभहस्ते हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार शामसुंदर शिंदे पाटील, आमदार राजेश पवार, आमदार तुषार राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे, जिल्हा कृषी अधिकारी टी.जी. चिमनशेट्टे, कार्यकारी अभियंता बांधकाम ए.आर. चितळे, जिल्हा जलसंवर्धन अधिकारी ए. एन. भोजराज यांची उपस्थिती राहणार आहे.
दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता आश्व, श्वान कुक्कुट प्रदर्शन व विविध स्पर्धेचे उद्घाटन खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून खासदार सुधाकरराव श्रृगारे, आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार शामसुंदर शिंदे पाटील, आमदार बालाजीराव कल्याणकर, सहाय्यक पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, उपायुक्त पशुसंवर्धन मधुसूदन रत्नपारखे, जिल्हा परिषद पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर, पाणी व स्वछता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांची उपस्थिती राहणार आहे.
दिनांक 24 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता कुस्त्यांची प्रचंड दंगल होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार शामसुंदर शिंदे पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. विशेष उपस्थिती म्हणून खासदार सुधाकरराव श्रृंगारे, आमदार भीमराव केराम, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम जी.एच. राजपूत, अधीक्षक अभियंता महावितरण सुधाकर जाधव, अशिक्षक अभियंता राष्ट्रीय महामार्ग सुनील पाटील, जिल्हा व्यवस्थापक बीएसएनएलचे पवनकुमार बारापत्रे, कंधारचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, तहसीलदार व्यंकटेश मुंढे यांची उपस्थिती राहणार आहे.
दिनांक 25 डिसेंबर रोजी लावणी महोत्सवाचा कार्यक्रम होणार असून लावणी महोत्सवाचे उद्घाटन खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विशेष उपस्थिती म्हणून खासदार सुधाकरराव शृंगारे, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार तुषार राठोड, आमदार मोहनअण्णा हंबर्डे, आमदार राजेश पवार, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ.अ.कानडे, जिल्हा कोषागार अधिकारी अभय मधुसूदन चौधरी, उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार एम.डी. थोरात, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणकचक प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी शिवप्रकाश चन्ना, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे आदींची उपस्थिती राहणार आहे.
दिनांक 26 डिसेंबर रोजी पारंपारिक लोककला महोत्सव होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार राम पाटील रातोळीकर, आमदार शामसुंदर शिंदे पाटील, आमदार माधवराव पाटील जवळगावकर, आमदार तुषार राठोड, आमदार राजेश पवार, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, महापालिकेचे आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधीर ठोंबरे. नरेगाचे उपजिल्हा कार्यक्रम समन्वयक व्ही.आर. पाटील, समाज कल्याण अधिकारी सत्येंद्र आऊलवार व माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
सायंकाळी 4 वाजता यात्रेतील विविध स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि समारोप कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी विशेष अतिथी म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा जाधव, कार्यकारी अभियंता बांधकाम एस.जी. गंगथडे, सागर तायडे, जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार, गट विकास अधिकारी शैलेंद्र वाव्हळे, ए.एन. मांजरमकर, मिथुन नागमवाड, राजकुमार मुक्कावार, एस.ए. धन्वे, विठ्ठल सुरोसे, एस.जी. कांबळे, मयूर अंदेलवाड, अमित राठोड, एस.एच. बळदे, एम.डी. जाधव,एस.यु. देशमुख, आर.एस. बजाज व एल.आर. वाजे यांची उपस्थिती राहणार आहे.