नांदेड| जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येणाऱ्या ल्याहारी गावात शिराळाच्या दिवशी का नटलीस..? असे म्हणत पटीने पत्नीवर कुऱ्हाडीने घावघालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. पत्नी बेशुद्ध झाली असताना मृत झाली असे गृहीत धरून पतीने स्वतः घरातील पत्र्याच्या लाकडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. सीताराम म्हात्रे वय ४२ वर्ष असे मृत पतीचे नाव असून सुनीता म्हात्रे वय ३५ असे जखमी पत्नीचे नाव आहे.
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी श्रीयाळ राजाच्या स्मरणार्थ सर्व महिला मातीचे शिराळ बनवून त्याभोवती गाणे म्हणतअसतात. या दिवशीच नांदेड जिल्ह्यातील ल्याहारी येथील पती पत्नी वाद झाला. यावेळी पती सीताराम म्हात्रे याने पत्नीशी वाद घातला तू का नटलीस..? म्हणत मारहाण केली. आणि हातात कुऱ्हाड घेऊन तिच्यावर सपासप वारकेले. अचानक झालेल्या वारामुळे पत्नी सुनीता सीताराम म्हात्रे ही बेशुद्ध होऊन रक्ताच्या थाटल्यात पडली. ती मृत झाली कि काय..? असे समजून त्याने सुद्धा घरातीलच दोरी घेऊन पत्राखालील लाकडाला दोर बांधून गळफास घेतला आणि आपली जीवनयात्रा संपवली आहे.
या हल्ल्यात सुनीता म्हात्रे ही मृत झाली नव्हती, तर गंभीर जखमी झाल्याने बेशुद्ध पडली होती. थोड्या वेळानंतर ती शुद्धीवरआल्यावर रांगत रांगत बाहेर गेली आणि रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांना बोलावले. तिची अवस्था पाहून इतर लोकांसोबतच सरपंच गणेश माधवराव बोईनवाड यांनी पळत जाऊन धीर दिला पाणी पाजले. आपल्या गाडीतून दवाखान्यात नेऊन पुढील उपचार केले. त्यात तिचा जीव वाचला. सध्या गंभीर जखमी महिलेची प्रकृती स्थिर आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरिक्षक राजेश पुरी, पी आय रायबोले, जमादार दत्त मुंडिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचं पंचनामा केला.