नांदेड/हदगाव। नांदेड जिल्ह्यातल्या हदगाव तालुक्यातील मौजे येवली गावातल्या महिलांनी शनिवारी भल्या पहाटे सापळा रचून अवैद्यरित्या विक्रीस येत असलेल्या दारूच्या वाहनाला आडवत दारूचे तीन बॉक्स जप्त केले आहेत, आणि आरोपीस चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


मागील तीन ते चार वर्षापासून येवली गावात अवैद्यरीत्या दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत होती, त्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत, या त्रासाला कंटाळून महिला व ग्रामस्थांनी पोलीस ठाणे ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पत्रव्यवहार केला, मात्र येथील दारू विक्रेतावर काही परिणाम झाला नाही.


त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी पुढाकार घेत शनिवारी दारू विक्रेत्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे, यापुढे दारू विक्रीवर आळा न घातल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थ महिलांनी दिला आहे.


