नवीन नांदेड l सिडको शंकरनगर गुरूवार बाजार नांदेड येथील रहिवासी वैभव शिवकुमार पईतवार हा लहानपणी एका अपघातामध्ये दोन्ही हात गमाववेला विद्यार्थी जीवनाला न कंटाळता परिस्थितीवर मात करून दोन्ही हात नसताना सुद्धा महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन उत्तीर्ण होऊन महसूल सहाय्यक मुंबई या पदावर यशाची शिखर गाठणारा हा विद्यार्थी खरंच खूप अभिमानकारक आहे.


दोन्ही हात नसताना जिद्दिने आणि मेहनतीने
सर्व संघर्षाला तोंड देत सर्व संकटाना सामोरे जात आपले ध्येय गाठणारा योद्धा वैभव पईतवारला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. शिवसेना शिंदे गटाचे दक्षिण जिल्हाप्रमुख जिल्हाप्रमुख तथा माजी उपमहापौर विनयभाऊ गिरडे पाटील, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रमेश ठाकूर,बळीरामपूर ग्रामपंचायत उपसरपंच नागेश वाघमारे,नारायण भांडवले, सारंग नेरलकर ,लांडगे मामा, वाडे मामा,मुजाहिद पठाण व सर्व मित्र परिवार यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.




