लोहा| लुकास्तरीय कर्मचारी व शिक्षक क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा गटसाधन केंद्र लोहा येथे पार पडल्या. त्यात मोठ्या संख्येने तालुक्यातील शिक्षकानी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. पीएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल माळाकोळीचे विज्ञान शिक्षक वैभव मोटरवार यांचा वाद्यवादन स्पर्धेमध्ये तर याच शाळेचे सहशिक्षक मनोज सोनकांबळे यांनी कथाकथन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकवला आहे. त्याची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड झाली आहे.


शिक्षकांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा लोहा शहरात पार पडल्या त्यातजिल्हा परिषद हायस्कूल माळाकोळी या शाळेचे शिक्षक वैभव मोटरवार यांचा वाद्यगायन तर मनोज सोनकांबके यांनी कथाकथन मध्ये प्रथम क्रमांक पटकविला त्या दोन्ही शिक्षकांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली या यशाबद्दल


गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे,शिक्षण विस्तार अधिकारी विठ्ठल आचने, केंद्रप्रमुख मंगल सोनकांबळे, शिक्षण विस्तार अधिकारी डी.आर.शिंदे, श्रीमती सरस्वती अंबलवाड,सौ. अंजली कापसे, शाळेचे मुख्याध्यापक माधव जायभाये, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशिनाथ शिरशीकर, यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.


लातूर येथे संपन्न झालेल्या विभाग स्तरीय विज्ञाननाट्य स्पर्धेमध्ये देखील पिएमश्री जिल्हा परिषद हायस्कूल माळाकोळी च्या विद्यार्थ्यांचा द्वितीय क्रमांक आला होता. शैक्षणिक,सांस्कृतिक सहशालेय आणि अभ्यासपूरक अशा विविध उपक्रमांमध्ये ही शाळा अग्रेसर आहे.



