नांदेड| सुरुवातीला मारहाण केली त्यानंतर पुन्हा ना मारहाण करण्यासाठी १० हजाराची खंडणी मागितल्याप्रकरणी सौरभ ऊर्फ दिपक संजय टाकळीकर आणि योगेश गंगाधर गुडुप वय-23 वर्षे या दोन आरोपीस 12 तासाचे आत खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या असून, हि कार्यवाही स्थानिक गुन्हे शाखेच्या पाहकाने केली आहे.


याबाबत सविस्तर वृत्त असे कि, फिर्यादीस आरोपीतांनी अगोदर मारहाण केली आणि पुन्हा न मारहाण करण्यासाठी 10,000/- रुपयाची खंडणी मागत होते. म्हणुन यातील फिर्यादीने पोलीस ठाणे भाग्यनगर येथे दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या अनुषंगाने उदय खंडेराय पोलीस निरिक्षक, स्थानिक गुन्हे शाखा यांचे आदेशाने स.पो.नि विठ्ठल घोगरे यांनी त्यांचे खंडणी विरोधी पथकातील अधिकारी अंमलदार यांचेसह गुन्ह्यातील आरोपीतांचा शोध घेतला.


आणि मोठ्या शिताफीने आरोपी 1) सौरभ ऊर्फ दिपक संजय टाकळीकर वय-26 वर्षे व्यवसाय-खाजगी नाकरी रा. शिवशक्ती नगर, एन.टी.सी. मिलरोड, कलामंदिर, नांदेड, 2) योगेश गंगाधर गुडुप वय-23 वर्षे व्यवसाय-शिक्षण व मजुरी रा. ओंकारेश्वर नगर, तरोडा खुर्द नांदेड यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाणे भाग्यनगर येथे कायदेशिर कार्यवाहीसाठी देण्यात आले. नांदेड पोलीसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगीरीबद्दल पोलीस अधीक्षक यांनी कौतुक केले आहे.
