नांदेड | नांदेड विभागातील पूर्णा–हुजूर साहिब नांदेड मार्गावर डीप स्क्रिनिंग करण्यासाठी बीसीएम (BCM) यंत्राद्वारे रोलिंग ब्लॉक कार्यक्रम आखण्यात आला आहे. यासाठी 3 तासांच्या 63 ब्लॉक्सना मान्यता देण्यात आली असून हे ब्लॉक 22 सप्टेंबर 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 या कालावधीत घेण्यात येणार आहेत.


या ब्लॉकमुळे काही गाड्यांच्या परिचालनावर परिणाम झाला आहे : रद्द करण्यात आलेली गाडी :
57659 परभणी–हुजूर साहिब नांदेड पॅसेंजर दिनांक : 22.09.25 ते 23.11.25फेऱ्या : 63सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.


उशीरा धावणाऱ्या गाड्या : 12766 अमरावती–तिरुपती द्विसाप्ताहिक एक्सप्रेस दिनांक : 22.09.25, 25.09.25, 29.09.25, 02.10.25, 06.10.25, 09.10.25, 13.10.25, 16.10.25, 20.10.25, 23.10.25, 27.10.25, 30.10.25, 03.11.25, 06.11.25, 10.11.25, 13.11.25, 17.11.25, 20.11.25फेऱ्या : 18


उशीर : अकोला ते पूर्णा दरम्यान 60 मिनिटे 16734 ओखा–रामेश्वरम साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक : 23.09.25, 30.09.25, 07.10.25, 14.10.25, 21.10.25, 28.10.25, 04.11.25, 11.11.25, 18.11.25फेऱ्या : 09

उशीर : जालना ते पूर्णा दरम्यान 60 मिनिटे उशिरा धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना विनंती केली आहे की, या कालावधीत प्रवासाची योजना आखताना बदललेल्या वेळापत्रकाचा विचार करावा असे आवाहन रेल्वे विभागाने केले आहे.


