नांदेड। येथील दिवंगत पत्रकार गौतम गळेगावकर यांच्या कुटुंबीयांना नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघ , व्हाईस ऑफ मीडिया , डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना आणि नांदेड पोलिसांच्या वतीने तीन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे . या मदतीतून दिवंगत पत्रकार गौतम कांबळे यांची पत्नी सुप्रिया कांबळे हिच्या नावे तीन लाख रुपयांचे किसान विकास पत्र तयार करण्यात आले असून हे किसान विकास पत्र पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते सुप्रियाला देण्यात आले.
यावेळी मराठी पत्रकार परिषद मुंबईचे कोष्याध्यक्ष विजय जोशी, विभागीय संघटक प्रकाश कांबळे , नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियाणी , डिजिटल मीडिया संपादक पत्रकार मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण खंदारे ,व्हॉईस ऑफ मीडियाचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास भोसले,योगेश लाटकर , पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे जिल्हा समन्वयक रवींद्र संगणवार, सरचिटणीस राम तरटे , पत्रकार राजू झंवर , व्हॉईस ऑफ मिडियाचे महानगर अध्यक्ष गणेश जोशी, प्रशांत गवळे , संघरत्न पवार, हैदर अली , नकुल जैन , आशिष कृष्णुरकर , दिनेश येरेकर आदींची उपस्थिती होती.
दरम्यान दिवंगत पत्रकार गौतम कांबळे यांची पत्नी सुप्रिया कांबळे हिस किसान विकास पत्र , साडी चोळी देऊन माहेरचा आहेर देण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यावेळी म्हणाले की , भविष्यातही कोणतीही अडचण आली तर मदतीसाठी मी आणि पोलीस प्रशासन आणि पत्रकार बांधव सदैव तत्पर असेल असा विश्वास दिला.