नांदेड। सातत्याने पाठपुरावा केल्यानंतरही जिल्ह्यातील भोकर, मुदखेड तालुक्यातील भुयारी मार्ग, रस्ते व ड्रेनेज अशी ७ कामे रखडल्याने शेतकर्यांची गैरसोय ,वाहतुकीचा प्रश्न या वरून माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांनी येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकारसह संबंधित अधिकारी वर्गाची चांगलीच झाडा झडती घेत त्यांना धारेवर धरले यानंतर सर्वच कामास गती देत डिसेंबर २०२४ अखेर कामे पूर्ण होतील असे आश्वासन नीती सरकार यांनी दिले आहे.
जिल्ह्यातील भोकर,मुदखेड तालुक्यातील रेल्वे विभागाशी संबंधित भुयारी मार्ग,ड्रेनेजचे काम मुदतीत पूर्ण होणे अपेक्षित होती मात्र अनेक महिन्यांपासून रखडली आहेत. कामे रखडल्याने शेतकर्यांची गैरसोय ,वाहतुकीचा प्रश्न निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री,खा अशोकराव चव्हाण यांनी मे २०२३ तसेच वेळोवेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या येथील डी. आर. एम. कार्यालयात कामांच्या सध्या स्थितीचा आढावा घेत कामे दर्जेदार व गतीने करण्याची मागणी केली होती.
यावेळी कामे पूर्ण करण्याची दिलेली मुदत संपली तरी कामे अदयाप पूर्ण न झाल्याने माजी मुख्यमंत्री, खा. अशोकराव चव्हाण यांनी नुकताच दक्षिण मध्य रेल्वेच्या येथील डी. आर. एम. कार्यालयात संबंधित कामांचा आढावा घेतला यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता बस्वराज पांढरे,कार्यकारी अभियंता प्रशांत कोरे ,सोनवणे, रेल्वेचे कार्यकारी अभियंता रवी, गोविदराव शिंदे नागेलीकर,बाळासाहेब देशमुख बारडकर,,रामचंद्र मुसळेसह संबंधित गावच्या सरपंचाची उपस्थिती होती.
यावेळी माजी मुख्यमंत्री,खा.अशोकराव चव्हाण यांनी देगांव -पाथरड,निवघा-खांबाळा,निवघा-इजळी फाटा ,भोकर-जाकापूर ,थेरबन ,भोकर व बेंबरच्या भुयारी रेल्वे मार्ग,रिटेनिंग वॉल लगतचे रस्ते, ड्रेनेजच्या कामांची स्ाध्यस्थिती जाणून घेतली.यातील काही कामे 2017 काही 2019 मध्ये सुरू करण्यात आली आहेत. ही कामे सहा महिणे ते वर्षात पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र तब्बल पाच ते सहा वर्ष उलटले तरी कामे पुर्ण झाली नाहीत. यामुळे या भागातील शेतकरी, रस्त्यामुळे वाहतूक, खोदकामांमुळे पाणी साचत असल्याने सबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधत त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली तसेच प्राधान्यक्रम ठरवून संबंधित कामे दर्जेदार व आणखी पुढे किती दिवसांत पूर्ण होणार असा प्रश्न उपस्थित करीत चांगलेच धारेवर धरले होते.
याबाबत त्वरित सकारात्मक निर्णय न झाल्यास रेल्वेच्या वरिष्ठाकडे तक्रार करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी रेल्वे भुयारातील पाणी पम्पिंगने काढणार ,जेथे शक्य नाही त्या ठिकाणी बाजूला रस्ता देण्याचा प्रयत्न तसेच ड्रेनेज अशा सर्वच कामांना गती देत कामे डिसेंबर २०२४ अखेर पूर्ण होतील असे आश्वासन नीती सरकार यांनी दिले आहे.