नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर फाटा जुने वसंतराव नाईक महाविद्यालय व सिडको हडको भागातील मुख्य मार्गावरील व अंतर्गत भागातील तर असदवन , जुना कौठा, नवीन कौठा वसरणी,वाघाळा भागातील पथदिवे,स्ट्रीट लाईट गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत नागरीकांना अंधारातून मार्गक्रमण करावे लागत असुन मनपा प्रशासनाने दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने तात्काळ स्ट्रीट लाईट, पथदिवे चालू करावीत अशी मागणी होत आहे.
मनपाच्या विद्युत विभागाने गणेशोत्सव काळात तात्पुरती लाईट व्यवस्था केली होती परंतु नवरात्रोत्सव
मुख्य रस्त्यावर व अंतर्गत भागात अंधाराचे साम्राज्य होते, रस्त्ता सिमेंट क्राकेट नावाखाली बंद असलेली दुतर्फा स्ट्रीट लाईट लातूर फाटा ते जुने वसंतराव नाईक महाविद्यालय आजही रस्ता काम होऊन बंद अवस्थेत असल्याने व अंतर्गत भागातील पथदिवे बंद असल्याने नागरिकांना व वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
सिडको हडको भागातील मुख्य बाजारपेठ व वसरणी वाघाळा असदवन, नवीन व जुनाकोठा भागातील मुख्य अंतर्गत भागात स्ट्रीट लाईट, पथदिवे अनेक ठिकाणी बंद असल्याने दिवाळीच्या सणानिमित्तेने मनपाच्या विद्युत विभागाने तात्काळ स्ट्रीट लाईट व अंतर्गत टुयब लाईट चालू करून दिलास द्यावा अशी मागणी नागरीकांनी केली आहे.