हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव नगरपरिषदेच्या सत्तासंघर्षात अखेर भगव्याने बाजी मारली असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रोहिणी भास्कर वानखेडे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ५६१० मते मिळवीत १२९३ मताची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांचे नंबर दोन चे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे कुमुद सुनील भाऊ सोनुले यांना ४३१७ मते मिळाली असून त्यांच्या १२९३ मतांनी पराभव झाला आहे. तर तिसऱ्या नंबरला ऊबाठा गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सिमा बालाजी घाळप्पा यांना ३७३९ मते मिळाली असून तीन नंबर वर समाधान मानावे लागले तरी नगरसेवकांच्या ७ जागेवर मजल मारली असून मशाल जोरदार पेटली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्षा वसंतराव देशमुख ३३४ मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडी चाऊस यांना ५४८ अपक्ष उमेदवार अरुणा गिरी यांना १९१ मते मिळाली आहे.नोटा ला १७८ अपक्ष उमेदवार सय्यद १ ७२ मते मिळाली आहे. शिवसेना भाजप युवतीचे नगरसेवक पदाचे उमेदवार ८ निवडून आले आहेत यामध्ये प्रभाग क्रमांक १ अ अरुणा गुणवंत काळे भाजपा विजय ब मध्ये सचिन गोविंदराव सूर्यवंशी भाजप प्रभाग क्रमांक ४ रुक्मीनाबाई पिराजी बाभुळकर भाजप ब मध्ये बालाजी दत्तात्रय शिंदे शिवसेना प्रभाग क्रमांक ६ अ शिवसेना पल्लवी संदीप हुलकाने ब मध्ये गोपाल मदनलाल सारडा शिवसेना प्रभाग क्रमांक १० अ ज्योती बालाजी राठोड शिवसेना ब मध्ये पांडुरंग तारू जाधव शिवसेना तर काँग्रेस पक्षाने सदस्य पदाच्या पाच जागा जिंकल्या आहेत.


या मध्ये प्रभाग क्रमांक २ अ मध्ये शेख कलीम शेख चांद ब मध्ये रुकसाना बी अहमद खान प्रभाग क्रमांक तीन काँग्रेस सीमा अमोल नरवाडे ब मध्ये अमित अडसूळ काँग्रेस प्रभाग क्रमांक पाच संदीप शिंदे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सदस्य पदाच्या सात जागेवर विजय मिळवला आहे.


या मध्ये विजयी उमेदवार प्रभाग क्र सात अ गुडूप रवीशंकर रंगराव मशाल ब विद्या किशोर भोस्कर प्रभाग क्रमांक आठ अ मध्ये प्रवीण कुमार रोकडे मशाल ब मध्ये चंदेल गीता शंकरसिह मशाल प्रभाग क्रमांक नऊ अ मध्ये लक्ष्मण काळबांडे मशाल ब मध्ये बेग हिना मुजीब बेग मशाल अशाप्रकारे बहुमत कुणाचेही न होता तिरंगी लढत झाली आहे शिवसेना भाजप पक्षाचे रोहिणी भास्कर वानखडे यांच्या विजयामुळे हदगाव नगरपरिषदेवर १० वर्षानी भगवा फडकला आहे.

आज पार पडलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहिणी वानखेडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांचा निर्णायक फरकाने पराभव केला. या विजयामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह संचारला असून शहरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. निकाल जाहीर होताच शिवसैनिकांनी फटाक्यांची आतषबाजी करत, एकमेकांना मिठाई भरवून आनंद व्यक्त केला. विजयाचा जल्लोष करत शहरात घोषणा दिल्या गेल्या.
या निवडणुकीत मतदारांनी विकास, पारदर्शक कारभार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणाऱ्या नेतृत्वावर विश्वास दाखवला असल्याचे बोलले जात आहे. विजयानंतर बोलताना रोहिणी भास्कर वानखेडे यांनी नागरिकांचे आभार मानत सांगितले की, “हदगाव शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करणार असून नगरपरिषद कारभारात पारदर्शकता, स्वच्छता, पाणीपुरवठा व मूलभूत सुविधा या बाबींना प्राधान्य दिले जाईल.”
या विजयामुळे हदगावच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून आगामी काळात नगरपरिषदेच्या विकासकामांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या विजयाचे खरे शिल्पकार आमदार बाबुराव पाटील कदम शिवसेना जिल्हा प्रमुख विवेक देशमुख माजी खासदार सुभाष वानखेडे अनिल पाटील बाभळीकर. गंगाधर पाटील चाभरेकर डॉ. संजय पवार गोपाळ सारडा, अशोकराव पवार अंबाळेकर यांनी जनतेचे आभार मानले आहे.

