Hadgaon News : हदगाव नगरपरिषदेवर भगवा फडकला: रोहिणी भास्कर वानखेडे यांचा दणदणीत विजय
हदगाव, गौतम वाठोरे| हदगाव नगरपरिषदेच्या सत्तासंघर्षात अखेर भगव्याने बाजी मारली असून शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रोहिणी भास्कर वानखेडे यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत ५६१० मते मिळवीत १२९३ मताची आघाडी घेत दणदणीत विजय मिळवला आहे. त्यांचे नंबर दोन चे प्रतिस्पर्धी काँग्रेस पक्षाचे कुमुद सुनील भाऊ सोनुले यांना ४३१७ मते मिळाली असून त्यांच्या १२९३ मतांनी पराभव झाला आहे. तर तिसऱ्या नंबरला ऊबाठा गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सिमा बालाजी घाळप्पा यांना ३७३९ मते मिळाली असून तीन नंबर वर समाधान मानावे लागले तरी नगरसेवकांच्या ७ जागेवर मजल मारली असून मशाल जोरदार पेटली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्षा वसंतराव देशमुख ३३४ मते मिळाली तर वंचित बहुजन आघाडी चाऊस यांना ५४८ अपक्ष उमेदवार अरुणा गिरी यांना १९१ मते मिळाली आहे.नोटा ला १७८ अपक्ष उमेदवार सय्यद १ ७२ मते मिळाली आहे. शिवसेना भाजप युवतीचे नगरसेवक पदाचे ...
