HomeनांदेडDemand ; उन्हाचे चटके जाणवत असल्याने रस्ते सुनसान. रुमाल , टोप्या चष्म्यांची...

Demand ; उन्हाचे चटके जाणवत असल्याने रस्ते सुनसान. रुमाल , टोप्या चष्म्यांची मागणी

उस्माननगर l मार्च महिन्यात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसामुळे वातावरण थोडा फार बदल करून गारवा निर्माण झाला.नंतर या महीन्यात सुरूवातीपासून उस्माननगर परिसरात चाळीस च्या वर तापमान वाढल्याने नागरिकांची परेशानी वाढली आहे. उन्हाचे चटके जाणवत असल्याने रस्ते सुनसान दिसत आहे थंड ठिकाणी व झाडाखाली गप्पांची मैफल रंगत आहे.

कंधार तालुक्यात अवकाळी पाऊस व वाऱ्यामुळे आंब्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. व्यापारी व शेतकरी संकटात सापडला. अवकाळी पावसाने नेहमी सारखे तांडव या भागात पाहायला मिळाले नसल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला. आणखी चार दिवस यलो अलर्ट जाहीर केल्यामुळे नागरिक चिंतेत जगत आहेत.

गतवर्षी उन्हाचे चटके चांगलेच बसले होते. उन्ह चांगलेच तापत आहे. उन्हापासून बचाव करण्यासाठी मोठ मोठे रूमाल , टोप्या , वाहनचालक चष्मा खरेदीसाठी बाजारात गर्दी करताना पहावयास मिळत आहेत. याचबरोबर नागरिक थंड हवा घेण्यासाठी कुलर , पंखे नवीन खरेदी करताना आढळून येतात. पाणी फिल्टर जार साठी दहा ते वीस रुपये मोजावे लागत आहेत. थंड पाणी बाटल वीस रुपये ला घेऊन तहान भागवीत आहेत.

उन्हाळा सुरू झाल्याने शीतपेयाची टरबुज , आईस्क्रीम , बर्फ गोळा , विक्री करताना दिसत असून बच्चे कंपनी खरेदी करून पोटाला थंड करताना दिसतात. सुर्य आग ओकत असल्याने नागरिकांचा जीव लाही लाही होत आहे. गरमीचे प्रमाण वाढत आहे. अनखीन एका महीन्यात उन्हाची तीव्रता वाढल्यावर काय परिणाम होतील हे येणारा काळच ठरवेल.या बेताने नागरिक हैराण होत आहेत. उन्हाचा पारा वाढत असल्याने नागरिक दुपारी बाहेर फिरणे टाळत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments