गडगा | नाथोबा विद्यालय येथील विद्यार्थिनी माहेश्वरी माधव गंगोत्री हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा (NMMS) मध्ये उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या गुणवत्तेची परंपरा अधोरेखित केली आहे. १७९ गुणांपैकी तब्बल १३५ गुण मिळवत ती उत्तीर्ण झाली असून, तिच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण आहे.

माहेश्वरीच्या या यशाबद्दल प्रगती शिक्षण संस्था चे सचिव मा. दिगंबरराव पाटील पेटकर, संस्थेचे संचालक मंडळ, शाळेचे मुख्याध्यापक मा. भिमेश्वर पाटील पेटकर तसेच सर्व शिक्षक व गावातील शिक्षणप्रेमींनी तिचे अभिनंदन केले.

शाळेत सत्कार सोहळा
या यशानिमित्त शाळेत माहेश्वरी व तिचे पालक माधवराव गंगोत्री यांचा विशेष सत्कार करण्यात आला. मुख्याध्यापकांनी शुभेच्छा देत तिच्या परिश्रमांचे कौतुक केले. जेष्ठ शिक्षक श्री चोंडे सर व श्री बादुलगे सर यांनी विद्यार्थिनीचा गुणगौरव करत इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण असल्याचे सांगितले. यावेळी राठोड सर, जाधव सर, पाटील सर व अलकाताई यांची उपस्थिती होती.


मार्गदर्शक शिक्षकांचे विशेष अभिनंदन
माहेश्वरीला अभ्यासात मार्गदर्शन करणारे सहशिक्षक श्री बादुलगे सर, श्री श्याम पाटील सर, श्रीकांत पाटील सर व श्री जाधव सर यांचे मुख्याध्यापकांनी विशेष अभिनंदन केले. भविष्यातही शाळेचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत स्थान मिळवतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

माहेश्वरीच्या यशामुळे नाथोबा विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याचा पुन्हा एकदा गौरव झाला असून, तिच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

