श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| मागील अनेक दिवसापासून माहूर शहरातील पंतप्रधान आवस योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा होती. मात्र ही प्रतीक्षा आता संपली असून येत्या दोन दिवसात थकीत हप्ते लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष फिरोज दोसानी (Mayor Dosani) यांनी दिली आहे.


माहूर शहरात पंतप्रधान घरकुल योजनेचे लाभार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करण्या करिता अनुदानाचा पहिला व दुसरा,तिसरा हप्ता देण्यात आला आहे. तर कुठे कुठे पहिल्याच हप्त्यावर काम थांबले होते, त्यामुळे उर्वरित रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा न झाल्याने उर्वरित बांधकाम ठप्प झाले.काहीनी बांधकाम पूर्ण केले मात्र अनुदान मिळाले नसल्याने ते कर्ज बाजारी झाले होते.

लाभार्थ्यांचे रखडलेले अनुदान त्यांना मिळावे या साठी म्हाडा – शाशना कडे नगराध्यक्ष फिरोज दिसानी,मुख्याधिकारी विवेक कांदे उपनगराध्यक्ष नाना लाड, व नगरसेवकांनी सुरवाती पासूनच पाटपुरवठा केला होता.परंतु शासनाकडून अनुदान मिळण्यासाठी विलंब होत होता.मात्र आता ही प्रतीक्षा संपली असून येत्या दोन दिवसात ज्या लाभार्थ्यांचे बांधकाम झाले आहे,किंवा ज्यांचे काम प्रगती पथकावर आहे त्या सगळ्या लाभार्थ्यांचे थकीत अनुदान त्यांचा बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी दिली आहे.
