हिमायतनगर,अनिल मादसवार| शहरात तालुक्यातील सर्व ज्येष्ठ शिवसैनिक, पदाधिकाऱ्यांची संपन्न झालेल्या बैठकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या हिमायतनगर तालुकाप्रमुख निवडी बाबत चर्चा झाली. मात्र कोण्या एकाच्या नावावर एकमत झाले नसल्याने नवनिर्वाचित तालुकाध्यक्षपदाचा निर्णय हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यावर सोपविण्यात आला आहे. खासदारांचे खांदे समर्थक असलेले बोरगडी येथील शिवसैनिक संजय काईतवाड यांचं नाव आघाडीवर असून, त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होईल असे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर आता आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समितीसह नगरपंचायत, नागरपरिषदांच्या निवडणूक होणार आहेत. निवडणूक लागण्यापूर्वी उबाठा गटाच्या तालुकाध्यक्ष निवडीच्या हालचाली सुरु झाल्या. त्याच पार्श्वभूमीवर हिमायतनगर शहातील बोरगडी रोडवर असलेल्या बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेनेची बैठक जेष्ठ कार्यकर्ते बळीराम देवकते यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. यावेळी हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुख पदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांची मत जाणून घेण्यात आली. तालुका प्रमुख होण्यासाठी इच्छुकांचे भाऊगर्दी होती, मात्र चर्चेअंती अनेकांनी माघार घेतल्यानंतर माजी शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड बोरगडीकर, तालुका प्रमुख विठ्ठल ठाकरे, शिवसैनिक राम गुंडेकर, रामराव वानखेडे हे चार इच्छुक राहिले होते. मात्र त्यापैकी कोणाची निवड करायची बाबाबत एकमत होऊ शकले नाही.
हिमायतनगर शिवसेना तालुका प्रमुख पदासाठी चार जण इच्छुक असल्याने कोणाला या पदावर बसवायचे याचा निर्णय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख तथा हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनाच घ्यावा लागणार आहे. आता हिमायतनगर तालुका प्रमुख पदाबाबतचा निर्णय खासदार महोदय घेतील असे बैठकीत सवार्नुमते घोषित करण्याट आले असून, त्यांनी जो निर्णय घेतला तो सर्वाना मान्य राहील असे सांगण्यात आले आहे. आगामी जिल्हा परिषद व नगरपंचायतीच्या निवडणुका पूर्वी हिमायतनगर तालुका प्रमुख पदाची निवड केली जाणार असल्याचे या बैठकीवरून स्पष्ट झाले असून, आता हिमायतनगर तालुकाप्रमुख पदासाठी कोणाच्या नावावर खासदार महोदय शिक्कमोर्तब करतील याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
या बैठकीला हिमायतनगर नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष कुणालभाऊ राठोड, सुभाष शिल्लेवाड, प्रमोद राठोड, बाळूअण्णा चवरे ,गोविंद पाटील करंजीकर, चेयरमन पापा शिंदे, जफर लाला, रावसाहेब पाटील वटकळीकर, सुभाष शिंदे, मारुती सूर्यवंशी, गजानन देवसरकर, राजू पाटील कोठेकर, योगेश पाटील सोनारीकर, श्रीराम पाटील वाघीकर, अमोल पाटील कामारीकर, दीपक पाटील, ज्ञानेश्वर राहुलवाड, गोविंद पांडलवाड, संदीप बोलपेवाड, प्रल्हाद पा. सूर्यवंशी, गजानन पाटील, कपिल हराळे, संतोष फुलेवार, गणेश थोटे सरपंच, दत्ता गटकपवाड, अमोल धुमाळे, गजानन पाटील पोटेकर, शुभम दंडेवाड, सतीश शिंदे पळसपुरकर, अरविंद पाटील, विशाल राठोड, संदीप देशमुख पोटेकर, बंडु पाटील वडगाव, संतोष राठोड, गौरव पाटील, ईद्रीस शेवाळकर, सोहेल खान आदींसह तालुक्यातील सर्व शिवसैनिक, पदाधिकारी व जेष्ठ शिवसैनिक उपस्थित होते.