नांदेड l दिवंगत माजी खासदार वसंतराव चव्हाण सभागृह उमरी येथे आशा व गटप्रवर्तक फेडरेशनचे चौथे तालुका अधिवेशन ७ सप्टेंबर रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.


शिक्षणाच्या जननी माता सावित्रीबाई फुले,माता जिजाऊ यांच्या विचारांना व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच दिवंगत माजी खासदार वसंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन करून अधिवेशनाची सुरुवात करण्यात आली. अधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी फेडरेशनच्या अध्यक्षा तथा सीटू राज्य सचिव कॉ.उज्वला पडलवार ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून सीटूचे जनरल सेक्रेटरी कॉ. गंगाधर गायकवाड यांची उपस्थिती होती.


कॉ.उज्वला पडलवार यांनी आपल्या भाषणात जन सुरक्षा अभियाना विरोधात एकीच्या बळावर लढाई तीव्र करून आपले अधिकार टिकून ठेवावे लागतील असे मनोगत व्यक्त केले. आशा व गटप्रवर्तक अत्यंत तुटपुंज्या मानधनांवर काम करतात त्यांना किमान वेतन देऊन कर्मचारी दर्जा देण्यात यावा असेही त्या म्हणाल्या.


सीटू संघटनेमुळेच आज आशा ताईंची नोकरी टिकून आहे व लवकरच राज्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक ताई सेवेत कायम होतील. त्यासाठी संघर्ष अजून तीव्र करावा लागेल असे कॉ.गंगाधर गायकवाड यांनी उदघाटनपर भाषणात संबोधित केले.

अधिवेशनाचे प्रस्ताविक सलमा शेख यांनी केले.
कॉ.उज्वला पडलवार यांना क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नावाने देण्यात आलेला राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केल्यामुळे त्यांचा तालुका कमिटीच्या वतीने सन्मान करण्यात आला.
उमरी तालुका नूतन कमिटी खालील प्रमाणे एक मताने निवडण्यात आली.तालुकाध्यक्षपदी शोभा मरावार, सचिव पदी मीरा तुपसागरे, उपाध्यक्ष मालती पवार, सहसचिव लक्ष्मी दाडेराव, तर कार्यकारणी सदस्य पदी पूजा चव्हाण, मीरा डूमणे, विशाखा खंडेलोटे, आशा वाघमारे, सदिका पंडित, वैशाली झुंजारे, संगीता गायकवाड यांची निवड करण्यात आली.
यावेळी उमरी येथील प्रतिष्ठित नागरिक विजय पाटील सावंत, धोंडिबा पाटील सावंत, राजेश पाटील ढगे, दासा पाटील, विलास गाडे, पत्रकार सुरेश वाघमारे, धोंडिबा मारावार आदींची उपस्थिती होती.
अधिवेशन यशस्वी करण्यासाठी उमरी तालुक्यातील आशा व गटप्रवर्तक ताईंनी परिश्रम घेतले.
-कॉ.उज्वला पडलवार,
जिल्हाध्यक्षा : आशा व गटप्रवर्तक फेडरेशन नांदेड जिल्हा.
मो. 9011212123.
दि. ८ सप्टेंबर 2025
कृपया बातमी प्रसिद्धीस द्यावी ही नम्र विनंती.


