नांदेड l 100 दिवस मुख्यमंत्री प्रशासकीय सुधारणा मोहिमेअंतर्गत नांदेड तालुका मराठवाड्यामध्ये प्रथम आला आहे,त्या अनुषंगाने विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र, शाल,बुके देऊन श्री संजय वारकड तहसिलदार नांदेड यांचा छत्रपती संभाजी नगर येथे यथोचीत रित्या सत्कार करण्यात आला आहे.


30 में रोजी छत्रपती संभाजी नगर येथे एका सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला, या शुभ प्रसंगी राहुल कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड, पांडुरंग बोरगावकर अपर जिल्हाधिकारी नांदेड तसेच मराठवाड्यातील सर्व सन्माननीय जिल्हाधिकारी ,सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व अपर जिल्हाधिकारी ,सर्व निवासी उप जिल्हाधिकारी,उप जिल्हाधिकारी सामान्य,उपविभागीय अधिकारी , तहसीलदार यांची विशेष उपस्थिती होती.




