हिमायतनगर (अनिल मादसवार) हिमायतनगर नगरपंचायतीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांसह नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी कर्डिले यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


या भेटीदरम्यान हिमायतनगर शहराच्या सर्वांगीण विकासा संदर्भात चर्चा करण्यात आली. नगरपंचायतीच्या माध्यमातून नागरी सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व विकासकामे प्रभावीपणे राबविण्यास प्रशासनाचे सहकार्य अपेक्षित असल्याचे नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी सांगितले.

यावेळी तालुकाध्यक्ष गजानन सूर्यवंशी, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष राठोड, माजी नगराध्यक्ष अखिलभाई, तसेच नगरसेवक समदखान, सरदार खान, विनोद गुंडेवार, अब्दुल कलीम, इलियास भाई, एम. मुजतबा मतीन, फिरदौस भाई यांच्यासह अन्य नवनिर्वाचित नगरसेवक व त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचे अभिनंदन करत हिमायतनगरच्या विकासासाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य दिले जाईल, असे आश्वासन दिले.


