किनवट,परमेश्वर पेशवे। किनवट आदिवासी दुर्गमभाग समजल्या जाणाऱ्या दऱ्याखोऱ्यातील वागदरी ,मांजरी माता ,येथील शाळेंना हिंगोली नांदेड जिल्ह्याच्या तीन शिक्षण अधिकाऱ्यांनी सात किलोमीटर पायी चालून भर पावसात अचानक भेटी दिल्या.
या दुर्गम भागातील सदरील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची पाहणी केली व शाळेतील भौतिक सुविधाची तपासणी सुद्धा या शिक्षणाधिकाऱ्यांनी केली. अति दुर्गम भाग असलेल्या शाळाना शासनाच्या माध्यमातून भौतिक सुविधा प्राप्त करून देणार व शैक्षणिक दर्जा उंचावणार यासाठी नेहमी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही नांदेडचे शिक्षण अधिकारी माधव सानगर व दिलीप कुमार बनसोडे यांनी दिली . यांच्यासोबत हिंगोलीचे शिक्षण अधिकारी प्रशांत दिग्रसकर यांची सुद्धा उपस्थिती होती. शिवनी बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड हे त्यांच्यासोबत होते.
अति दुर्गम भाग असलेल्या या दरीखोरीतील शाळेंना दोन जिल्ह्याच्या तीन शिक्षणाधिकाऱ्यांनी एकाच वेळी भेट देण्याची ही जिल्ह्यातली पहिलीच वेळ असावी अति दुर्गम भाग असलेल्या शाळांमध्ये थेट शिक्षण अधिकारी पोहोचल्याने परिसरातील रोडवरील शाळेतील बहुतांशी दांडी बाहादर कर्मचाऱ्यांची मात्र धाबे दनानली. या तिन्ही शिक्षण अधिकाऱ्यांनी वागदरी व मांजरी माता येथील गावातील विद्यार्थ्यांशी व ग्रामस्थांशी मुक्तपणे संवाद साधला व मनमुरादपणे गप्पागोष्टी केल्या. व त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यात असल्या घनदाट वृक्षवल्ली नटलेल्या आरण्याची सफर केली .